केंद्रात ७ वर्ष पूर्ण केलेल्या मोदी सरकारचा काळे झेंडे दाखवून निषेध

रावेरात कॉग्रेस पक्षाकडून झाले आंदोलन
केंद्रात ७ वर्ष पूर्ण केलेल्या मोदी सरकारचा काळे झेंडे दाखवून निषेध

रावेर- Raver

केंद्रातील मोदी सरकारच्या ७ वर्षाच्या कार्यकाळात अनेक उद्योगधंदे बंद पडले आहे. बेरोजगारी, खाजगीकरण,आरोग्य यंत्रणा कोलमडून पडल्याने, महामारीच्या काळात देश हतबल झाला आहे. त्यामुळे केंद्रातील सरकारचे ७ वर्ष सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटणारे आहे. असा घणाघात काँग्रेस तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी केला.

येथील काँग्रेस पक्षाच्या कार्यलयाबाहेर रावेर तालुका काँग्रेस कमेटीने मोदी सरकारचा काळे झेंडे दाखवून सोमवारी निषेध केला.यावेळी महाजन बोलत होते.याप्रसंगी प्रकाश सुरदास,रामदास लहासे,सुर्यभान चौधरी,भूपेश जाधव व पदाधिकारी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com