डाॅ.प्रेमसिंग गिरासे यांच्या हत्येचा निषेध

जिल्हाधिकारी याचना दिले निवेदन
डाॅ.प्रेमसिंग गिरासे यांच्या हत्येचा निषेध

जळगाव-प्रतिनिधी Jalgaon

दराने,ता.शिंदखेडा जिल्हा धुळे येथील खाजगी पशुपदविकाधारक डाॅ.प्रेमसिंग राजेंद्र गिरासे यांची दिनांक 6 सप्टेंबर रोजी निर्घुण हत्या करण्यात आली. या हत्येचा निषेध व्यक्त करत जळगाव जिल्हा पशु पदविका पशुचिकित्सा सेवा संघ व राज्य संघटना यांनी जिल्हाधिकारी जळगाव, पोलीस अधीक्षक, तहसी लदार यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला.

निवेदनात म्हटले आहे की, प्रेमसिंग गिरासे यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी केली आहे. निवेदन देतेवेळी पशुपदविका पशुचिकित्सा सेवा संघाचे अध्यक्ष डॉ.दिपक लोखंडे, उपाध्यक्ष डॉ.सोपान दुट्टे, सचिव डॉ.संदीप भालेराव, डॉ.विकास नवले, डॉ.गणेश राजपूत उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com