पोलीस अधीक्षकांकडून कर्मचार्‍यांना सुखद धक्का !

जिल्ह्यातील 316 पोलीस कर्मचार्‍यांना पदोन्नती
पोलीस अधीक्षकांकडून कर्मचार्‍यांना सुखद धक्का !
डॉ. प्रवीण मुंढेDr. Praveen Mundhe

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्हा पोलीस दलात पहिल्यांदाच एकाचवेळी 316 कर्मचार्‍यांना पदोन्नती देण्यात आली आहे. या पदोन्नतीचे जंबो आदेश आज शुक्रवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पारित केले आहेत.

या आदेशानुसार पोलीस कॉन्स्टेबल ते पोलीनाईक, पोलीस नाईक ते पोलीस हवालदार व सहाय्यक फौजदार याप्रमाणे पदोन्नती देण्यात आली आहे.

सहाय्यक फौजदार म्हणून 94, पोलीस हवालदारपदी 100 व पोलीस नाईकपदी 122 जणांना पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नतीच्या प्रतिक्षेत असलेल्या कर्मचार्‍यांना कोरोना काळात सुखद धक्का मिळाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकाळानुसार पात्र पोलीस नाईक, पोलीस कॉन्स्टेबल तसेच पोलीस हवालदार या कर्मचार्‍याची पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात आली.

यात पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी या प्रक्रियेसाठी कमिटी तयार केली होती. यात स्वतः मुंढे याच्यासह अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, कार्यालय अधीक्षक नागेश हडपे, आस्थाना शाखेतील दीपक जाधव, सुनील निकम यांचा समावेश होता.

अधीक्षक मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली या कमिटीने अहोरात्र परिश्रम करुन पदोन्नतीची प्रक्रिया पार पडली. आज शुक्रवारी डॉ. प्रवीण मुंढे यांनी याबाबतचे आदेश पारित केले.

यात जळगाव शहरातील पोलीस ठाण्यांसह जिल्हाभरातील सर्वच पोलीस ठाणे, तसेच स्थानिक गुन्हे शाखा, तसेच पोलीस दलाशी संलग्नित इतर शाखांमधील कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

करोनात कर्मचार्‍यांना सुखद धक्का

पोलीस अधीक्षकांना काढलेल्या आदेशानुसार 94 कर्मचार्‍यांना पोलीस हवालदार पदावरुन सहाय्यक फौजदार पदी पदोन्नती देण्यात आली आहे.

तर 100 कर्मचार्‍यांना पोलीस नाईकपदावरुन पालीस हवालदारपदी तर 122 कर्मचार्‍यांना पोलीस कॉन्स्टेबल पदावरुन पोलीस नाईक पदी नियुक्ती देण्यात आली आहे.

अशाप्रकारे एकूण 316 कर्मचार्‍यांना पदोन्नती देण्यात आली आहे. पोलीस दलात पहिल्यांदाच एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्मचार्‍यांना पदोन्नती देण्यात आली आहे.

दरम्यान कोरोनामुळे एकीकडे तपास, गुन्हे तर दुसरीकडे कोरोनामुळे अहोरात्र बंदोबस्त यात व्यस्त असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांना पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सुखद धक्का दिला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com