कृषी खत विक्रेत्यांच्या बैठकीत बोलताना आ.चंद्रकांत पाटील. (MLA Chandrakant Patil)
कृषी खत विक्रेत्यांच्या बैठकीत बोलताना आ.चंद्रकांत पाटील. (MLA Chandrakant Patil)
जळगाव

मुक्ताईनगर : खतांसंदर्भातील अडचणी तत्काळ सोडविणार - आ.चंद्रकांत पाटील

सावदा येथे खतांच्या पॉईंटला मंजुरी, मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील कृषी खत विक्रेत्यांची आढावा बैठक

Rajendra Patil

वितरकांच्या मागण्या कंपन्यांनी माल देतांना दुकानदारांना लिंकींगची सक्ती करु नये. आवश्यकतेनुसार, मागणी नुसार दुकानदारांना खते मिळावी, माल पोच मिळावा, सावदा येथे रॅक पॉईंट वाढवून मिळावा, मुक्ताईनगर तालुक्यातील 350 मॅट्रीक टन खते इतरत्र वळविला गेल्याने तसेच 60 हजार टन माल कमी उपलब्ध झाल्याने तात्काळ उपलब्ध करून मिळावा, मागणी व्यतिरीक्त इतर खतांची सक्ती नका.

मुक्ताईनगर । प्रतिनिधी Muktainagar

मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यात खतांची मोठी कमतरता असल्याने शेतकरी व खत विक्रेते अडचणीत आले आहेत. परंतु कंपनीकडूनच खतांची विक्री कमी प्रमाणात केली जात असल्याने खतांचा तुटवडा जाणवत आहे. यापुढे खतांच्या उपलब्धतेतिल अडचणी संबंधित मंत्र्यांची पालकमंत्र्यांची भेट घेऊन लवकर दूर करण्यात येतील असे आश्वासन आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले.

दरम्यान, यासंदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन समस्या मांडले असता सावदा येथे खतांच्या रॅक पॉइंटला तात्काळ मंजूरी देण्यात आली आहे.

आजच्या परिस्थितीत विविध आवश्यक ती खते मिश्र खते, युरीया आवश्यकतेनुसार मिळत नसल्याचे उनेक शेतकर्‍यांनी आ.चंद्रकांत पाटील यांचे निदर्शनास आणून दिले असता 18 रोजी आ.चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) यांनी मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील कृषी खत विक्रेत्यांची आढावा बैठक घेवून आवश्यकतेनुसार खते उपलब्ध होतांना येत असलेल्या विविध अडचणी जाणून घेतल्या.

या बैठकीत आ.चंद्रकांत पाटील यांनी खतांसबंधीत शेतकर्यांना येत असलेल्या विविध अडचणी व वितरकांना येत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी चर्चा झाली.

या बैठकीस विनोद तराळ, यु.डी.पाटील, प्रभाकर पाटील, अनंतराव देशमुख, ईश्वर रहाणे, शिवसेना तालुका प्रमुख छोटु भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनिल पाटील, कृषी वितरक संघटनेचे तालुका अध्यक्ष धिरज जैन, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र हिवराळे, गोपाळ सोनवणे, शुभम शर्मा, दिपक पवार, प्रफुल्ल पाटील, स्विय्य सहायक प्रविण चौधरी व संतोष कोळी, मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील कृषी खत विक्रेत्यांची उपस्थिती होती.

आजची परिस्थिती भविष्यात उद्भवणार नाही - आ.पाटील

शेतकरी व वितरकांना खतांसदार्भात येत असलेल्या अडचणींचा पाठपुरावा जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांचेकडे करुन अडचणी सोडविल्या जाव्यात यासाठी बैठक बोलावली होती. पालकमंत्री व कृषीमंत्री यांचेशी याबाबत चर्चा झाली. त्यांनी खतांच्या मागणी संदर्भात माहीती मागवली असून यासंदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन व तसे पत्र कृषी मंत्री दाद भुसे व पालकमंत्री यांना देवून भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही असे या बैठकीत आ.चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

खतांसदार्भात येत असलेल्या अडचणींविषयी आ. चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांना तसे पत्र देवून जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेवून तसे लेखी पत्र दिले असुन तात्काळ खते उपलब्ध होणार असल्याचे तसेच इतरही समस्या सोडविल्या जाणार असल्याचे आ.चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.

सावदा येथे खतांचे रॅक पॉईंट मंजूर

मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यात खतांचा तुटवडा असल्याने तालुक्यातील शेतकर्‍यांनी तसेच खते विक्रेत्यांनी ही समस्या आ.चंद्रकांत पाटील यांच्याकडे मांडली. त्यावर आमदार पाटील यांनी तात्काळ बैठक घेऊन ही समस्या कृषी मंत्री व पालकमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिली. पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी रेल्वेचे डीआरएम यांच्याशी चर्चा केली असता डीआरएम यांनी सावदा येथे रॅक पॉईंट तात्काळ उपलब्ध करून देण्यासंदर्भात होकार दिला आणि आज उशिरापर्यंत यासंदर्भात पत्रक काढण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांना भ्रमणध्वनीवरून दिली.

Deshdoot
www.deshdoot.com