रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार, या दुकानावर छापा

रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार, या दुकानावर छापा

जळगाव - Jalgaon

रेल्वे तिकिट देण्याबाबतचा कुठलाही परवाना नसतांना, रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणार्‍या जळगाव शहरातील खान्देश कॉम्प्लेक्समधील महालक्ष्मी टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स या दुकानावर बुधवारी रेल्वे सुरक्षा बलासह भरारी पथकाने छापा टाकला. या कारवाईत पथकाने 6 हजार 733 रुपयांचे तिकिट जप्त केले असून महालक्ष्मी टूर्स अ‍ॅण्ड ट्रव्हलचे मालक संजय मोतीराम चौधरी वय 53 यांना अटक केली आहे. त्यांना रेल्वेच्या न्यायालयात हजर केले असता एका दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

भुसावळच्या वाणिज्य विभागाचे प्रमुख सीनियर डीसीएम तथा आरपीएफ विभागाचे प्रमुख सीनियर डीएससी यांच्या मार्गदर्शनानुसार भुसावळच्या रेल्वे वाणिज्य विभागाचे एटीएस पथकातील मुख्य तिकिट निरिक्षक हेमंत सावकारे, मुख्य तिकिट निरिक्षक ए. एस. राजपूत, उपमुख्य तिकिट निरिक्षक प्रशांत ठाकूर व जळगावचे रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरिक्षक सी एस पटेल यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. दरम्यान कुठलाही परवाना नसतांना महालक्ष्मी टूर्स ट्रॅव्हल्सने मोठ्या बाजारावर काळा बाजार केल्याची शक्यता होत असून या कारवाईने जळगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com