गुरांची अवैध वाहतुक रोखली
जळगाव

गुरांची अवैध वाहतुक रोखली

१२ लाखांचा मुद्देमाल ताब्यात, आरोंपीना न्यायालयीन कोठडी

Manohar Kandekar

चाळीसगाव- प्रतिनिधी chalisgaon

तालुक्यातील मेहुणबारे पोलीस स्टेशनच्या हद्दीतून अवैद्यरित्या जनावारांची वाहतुक करणारी दोन वाहने काल जप्त करण्यात आली. याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या दोन्ही वहानांमध्ये अवैद्यरित्या कोंबून तब्बल ५५ जणावरांची वाहतुक केली जात होती. पहिल्या कारवाईत चाळीसगाव-मालेगाव रोडवरील साकुर फाट्याजवळ पोलिसांनी टॅम्पो आडवून त्यातून सहा म्हशींची सुटका केली असून ६० हजारांच्या म्हशी व ३ लाख रुपये किमतीचे वाहन ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी शे. शाकीब, शे.मोहम्मद यास अटक करण्यात आली. तर दुसर्‍या कारवाईत तालुक्यातील तरवाडे बारी येथील चेकपोस्टवर ट्रक आडवून त्यातून ४९ म्हशीच्या पालडूची सुटका करण्यात आली. पोलिसांनी ३ लाख ९० हजार रुपये किमतीचे जनावरासह ५ लाख रुपये किमतीचे वाहन ताब्यात घेतले. याप्रकरणी तस्लीम ममरेज(२८) रा.हरियाणा, आशीफ हसन कुरेशी(२२) रा.काठा, उत्तर प्रदेश यांनी अटक करण्यात आली, तिघांचा आरोपीना आज न्यायालयात हजर केले असता, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com