गुरांची बेकायदेशीर वाहतूक रोखली

गुरांची बेकायदेशीर वाहतूक रोखली

रावेर पोलिसांची मोठी कारवाई

रावेर | प्रतिनिधी Raver

करोना संसर्ग रोखण्यासाठी आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सीमा तपासणी नाक्यावर सुरू असलेल्या वाहन तपासणीप्रसंगी महिंद्रा पीकअप आणि आयशर या दोन वाहनांमधून गुरांची बेकायदेशीर वाहतूक केली जात असल्याचे, तपासणी पथकास आढळून आल्याने मध्य प्रदेशातील ७ जणांविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

सध्या महाराष्ट्रात येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात असतांना बुधवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास महिंद्रा पिकअप क्र.एमपी १२ जिए १९१० मध्ये १ लाख ६५ हजार किमतीचे काळी शिंगे असलेल्या मुऱ्हा जातीचे काळ्या रंगाच्या २ म्हशी १ गावरान म्हैस,३ मुऱ्हा जातीचे पाडे (हेले) असा मुद्देमाल वाहनासाहित १ लाख ६५ हजाराचा ऐवज व आयशर वाहन क्रमांक एमपी ०९,जीएच १५३७ यावाहनातून ६ लाख ८५ हजार रुपये किमतीचे काळ्या शिंगे असलेल्या मुऱ्हा जातीचे काळ्या रंगाच्या १३ म्हशी व ७ पाडे मिळून आल्याने, दोन्ही वाहनातून १६ म्हशी व १० पाडे (हेले) असा एकूण१५ लाख ५० हजराचा मुद्देमाल जप्त करत ओमप्रकाश नवलसिंग गोलकर रा.आरुद ता.पंधाना जि. खंडवा,शेख फिरोज शेख मजीद रा.खंडवा विमलीपुरा

सादिक शाह हकीम शाह रा.झोकर ता.मकसिद जि. शाजापुर,रईस सईद कुरेशी रा.आष्टा जि.सिहोर,नासीर समी कुरेशी रा.आष्टा जि.सिहोर,साहिद रईस मनसुरी रा.आष्टा जि सिहोर,सोहेल मिन्नत कुरेशी रा झोकर ता.मकसिद जि. शाजापुर यांच्याविरुद्ध वैधरित्या, बेदरकारपणे, अपुऱ्या जागेत, कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याच्या प्रमाणपत्राशिवाय कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक करताना मिळून आले म्हणून पोलीस कॉन्स्टेबल मुकेश सोनवणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे,पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनानुसार पोलिस नाईक निलेश चौधरी करीत आहेत.कारवाईमधील सर्व जनावरे जळगांव बाफना गोशाळा जळगाव येथे पालनासाठी रवाना करण्यात आले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com