जळगाव : फुकटच्या पदवीसाठी साडेचार हजार अर्ज
जळगाव

जळगाव : फुकटच्या पदवीसाठी साडेचार हजार अर्ज

विद्यापीठात नियमित अडीच लाख विद्यार्थ्यांची मुदतीपूर्वी नोंदणी

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - कोरोनामुळे यावर्षी परीक्षा होतात की नाही ही साशंकता होती. दरवर्षी पदविका, पदवी, पदव्युत्तर अशा अंतिम वर्षाच्या विविध विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्याची अंतिम मुदत जानेवारी अखेरपर्यंत असते. यावर्षीदेखील ती 20 जानेवारीपर्यंत होती. या दरम्यान नियमित वेळेनुसार 2 लाख 47 हजार 58 विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज सादर केले होते. परंतु कोरोनामुळे राज्यशासनाकडून दयाळू पणाच्या निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार 10 मे ते 10 जूनपर्यंत साडेचार हजारच्यावर विद्यार्थ्यांनी परीक्षा न देता फुकट पदवी प्रमाणपत्र मिळू शकते या विचारातून सुमारे 4508 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले असल्याची माहिती विद्यापीठाच्या सूत्रांकडून सांगितले जात आह

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची संलग्न असलेल्या जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यातील प्रशाला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्च 2020 मध्ये होणार्‍या विविध विद्याशाखांच्या परीक्षांसाठी 20 जानेवारी ते 23 मार्च दरम्यान परीक्षांचे अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. दरम्यान, जिल्ह्यात तसेच राज्य पातळीवर कोरोनाचे संकटामुळे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासन तसेच विद्यापीठ प्रशासनाकडून घेण्यात आला होता. या दरम्यानच्या काळात ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरता आले नाहीत, त्यांना विद्यापीठा कडून अर्ज करण्यास मुदत द्यावी, अशी मागणी विद्यापीठ प्रशासनाकडे करण्यात आली. यावर विद्यापीठ अधिकार मंडळाकडून 10 मे., ते 10 जून दरम्यान ऑनलाईन अर्ज करण्याची स्वीकृती देण्यात आली होती. या विद्यार्थ्यांनी मुदतीत अर्ज सादर करणे अपेक्षित होते. परंतु, अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज भरले नाही. त्यामुळे तीन वेळा मुदतवाढ द्यावी लागली.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाअंतर्गत बीए, बीएस्सी, बीकॉम, एम ए, एमकॉम, एमएससी, एमसीसी, बीएड, बीपीएड, एमपीएड, एलएलबी, एलएलएम, बीएसडब्ल्यू, एमएसडब्ल्यू, डीसीएम, इंजिनिअरिंग, जीएसटी, एमसीए अशा अनेक विविध विद्याशाखांमध्ये नियमित वेळेनुसार 20 जानेवारी ते 23 मार्च 2020 दरम्यान प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच अंतिम वर्षाच्या परीक्षांसाठी सुमारे 2 लाख 47 हजार 58 विद्यार्थ्यांनी पदवी, पदविका, पदव्युत्तर प्रमाणपत्र परीक्षांसाठी अर्ज सादर केले होते. तर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशासन अंतर्गत उद्भवलेल्या कोरणा परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता आले नाहीत. अशा विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी 10 मे ते 10 जून दरम्यान पुन्हा मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार ‘फुकट’च्या पदवी प्रमाणपत्रासाठी 4508 विद्यार्थ्यांनी परीक्षा न देता पदवी मिळू शकते या मानसिकतेतून उशिराने अर्ज दाखल केले आहेत.

दरवर्षी द्वितीय व तृतीय वर्षाचे बॅकलॉग विषय राहिलेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे चार ते पाच टक्के विद्यार्थी परीक्षा अर्ज भरत नाहीत. परंतु, यावर्षी राज्य शासनाने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना मागील सत्रातील गुणांच्या आधारे उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतल्यानुसार परीक्षा न देता पदवी मिळू शकते, या मानसिकतेतून कला, वाणिज्य, विज्ञानसह अन्य विद्याशाखांमधील विद्यार्थ्यांनी उशिरात उशिरा अर्ज सादर केले आहेत.

विद्यापीठ परीक्षा मंडळाकडून परीक्षा अर्ज स्वीकारण्याची मुदत संपल्यानंतर तसेच विविध विद्याशाखांच्या परीक्षा वेळापत्रक जाहीर झाले होते. असे असले तरी विद्यापीठाकडून पुन्हा मुदतवाढ देऊन विद्यार्थ्यांकडून अर्ज स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विद्यापीठ अनुदान आयोग किंवा राज्य शासनाने परीक्षा न घेता सर्वच अंतिम वर्षाच्या या विद्यार्थ्यांचे निकाल मागील सत्रांच्या गुणांनुसार सरासरी मार्क्स देऊन निकाल जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षाच होणार नाहीत, तर विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेले परीक्षा शुल्क विद्यापीठ प्रशासन परत देणार का? असाही प्रश्न विद्यार्थ्यांना कडून तसेच पालकांकडून देखील उपस्थित केला जात असल्याची चर्चा आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com