भुसावळातील मशीदीत एकत्र नमाज पठन
जळगाव

भुसावळातील मशीदीत एकत्र नमाज पठन

गौसिया नगरातील घटना : मौलानासह ७० जणांविरुद्ध गुन्हा

Ashish Patil

Ashish Patil

भुसावळ Bhusawal

कोरोनामुळे देशभरात धार्मिक स्थळांमध्ये जाण्यास बंदी आहे. तरीही येथील गौसिया नगरातील मशिदीमध्ये ईदनिमित्त नमाज पठणासाठी एकत्र आल्यामुळे मौलानासह ६० ते ७० लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात कोरोनाने कहर केला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील जाममोहल्ला परिसरातही मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले आहे.तर देशभरात कोरोनामुळे धार्मिक स्थळांमध्ये जाण्यास बंदी करण्यात आली आहे. तरीही येथील गौसिया नगर मधील मशिदीमध्ये मौलवी व इतर ६० ते ७० जणांनी प्रवेश करून शासनाचे धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नसतानाही नमाज पडण्यासाठी एकत्र जमले. त्यामुळे मौलवीसह समाज बांधवांनी शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले.

त्यामुळे बाजारपेठ पोलिस स्टेशनला गु.र.नं. ७५८/२०, भा.दं.वि. १८८, २६९ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ /(१) ३ चे उल्लंघन करून १३५ प्रमाणे दाखल करण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com