नगरसेविका अनिता सोनवणेंच्या अपात्रतेला स्‍थगिती

माहिती अधिकार कार्यकर्ते केदार सानप उच्च न्यायालयात जाणार
अनिता सोनवणे
अनिता सोनवणेनगरसेविका

भुसावळ - Bhusawal

येथील भाजप नगरसेविका अनिता एकनाथ सोनवणे ह्‍यांनी आपल्‍या कोळी जातीचा जात प्रमाणपत्र वेळेवर हजर न केल्‍याने केदार सानप यांनी त्‍यांच्‍याविरूध्‍द खटला दाखल केला होता. तत्‍कालीन जिल्‍हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्‍यासमोर चाललेल्‍या या प्रकरणात अनिता सोनवणे यांना दि.१८ जुन २०२० रोजी अपात्र केले होते.

या आदेशाविरूध्‍द अनिता सोनवणे यांनी आ. संजय सावकारे, नगराध्‍यक्ष रमण भोळे, त्‍यांचे पती सतिष सपकाळे यांच्‍याशी चर्चा करून महाराष्‍ट्र नगरपरिषदा,नगरपंचायती व औद्‍योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम ९(अ)अन्‍वये नगरविकास राज्‍यमंत्र्‍यांकडे स्‍थगितीसाठी अपील दाखल केले होते.

जिल्‍हाधिका-यांच्‍या या आदेशास नगरविकास राज्‍यमंत्र्यांनी आज दि. १७ ऑगस्ट रोजी तात्‍पुरती स्‍थगिती दिली आहे. सदर आदेश मंत्रालयातील कक्ष अधिकारी प्रविण पाटील यांच्‍या स्‍वाक्षरीने प्राप्‍त झाले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com