जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

गेल्या सहा महिन्यांपासून पोलिस दलात कर्मचारी असलेल्या पतीकडून मानसिक त्रास दिला जात होता. यातूनच पत्नीने गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असतांना गुरुवारी पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. सुरेखा संतोष सोनवणे (वय 33) रा. जिजाऊनगर असे मयत विवाहेचे नाव आहे.

याबाबत नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कर्मचारी संतोष सोनवणे पत्नीसह जिजाऊनगरात वास्तव्यास आहेत. बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास

मयत सुरेखा यांनी घरात कुणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार शेजारी राहणार्या एका महिलेच्या लक्षात येताच त्यांनी आरडा-ओरड करुन इतर शेजारच्यांना बोलावले.

नागरीकांनी सुरेखा यांना तात्काळ खाली उतरवले. यावेळी त्या अत्यवस्थ झाल्या होत्या. त्यांना यरिमहज एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

उपचार सुरु असतांना मालवली प्राणज्योत

सुरेखा सोनवणे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं त्यांची प्रकृती अत्यावस्थ होती. त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु असतांनाच गुरुवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला होता. शवविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सततच्या त्रासाला कंटाळून केली आत्महत्या

संतोष सोनवणे हा आपल्या पत्नीला कोणाशीही बोलु देत नसे. गेल्या महिनाभरापासून त्याने पत्नीचा मोबाईल देखील स्वत:जवळ ठेऊन घेतला होता. यामुळे ती माहेरच्या लोकांच्या संपर्कातही नव्हती. पतीच्या सततच्या त्रासामुळे कंटाळुन तीने आत्महत्या केली आहे. या प्रकरणात तीच्या पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक करावी अशी मागणी मनीषा भालेराव व जितेश शिरसाठ यांनी केली आहे.

सहा महिन्यांपासून सुरु होता छळ

गुरुवारी सुरेखा यांच्या बहिण मनीषा अर्जुन भालेराव (रा. पालघर) व भाऊ जितेश शिरसाठ (रा. खर्दे, ता. शिरपुर) हे घटना कळाल्यानंतर गुरुवारी जळगावात दाखल झाले. त्यांनी रुग्णालयता आक्रोश करीत असताना त्यांनी सुरेखा यांचे पती संतोष सोनवणे यांच्यावर आरोप केले असून संतोष सोनवणे हा गेल्या सहा महिन्यांपासून पत्नी सुरेखाचा शारिरीक व मानसिक छळ करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.