संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
जळगाव

जळगाव : एमआयडीसीत पानमसाला, गुटख्याच्या साठ्यावर पोलिसांची धाड

13 लाख 68 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon :

एमआयडीसीतील जी सेक्टरमधील एका गोडावूनमध्ये मानवी आरोग्यास हानीकारक प्रतिबंधित पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि गुटख्याच्या साठ्यावर पोलिसांनी 13 रोजी धाड टाकली. यात पोलिसांनी 13 लाख 68 हजार 120 रुपये किमतीचा ऐवज जप्त केला.

सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहम यांच्या पथकाने संयुक्तरित्या एमआयडीसीतील जी सेक्टरमधील गोडावूनमध्ये धाड टाकली. त्या ठिकाणी पोलिसांना पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि गुटख्याचा साठा आढळला. यात 10 लाख 23 हजार 360 रुपये किमतीच्या गोवा कंपनीच्या पानमसाल्याच्या 41 गोण्या, दोन लाख 24 हजार 360 रुपये किमतीच्या जीवन कंपनीचा जर्दा सुगंधित तंबाखूच्या 13 गोण्या, एक लाख एक हजार 400 रुपये किमतीच्या गोवा 1000 गुटख्याच्या 2 गोण्या असा एकूण 13 लाख 68 हजार 120 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहम यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर, सहाय्यक फौजदार चंद्रकांत पाटील, हेड कॉन्स्टेबल रवींद्र घुगे, नाईक महेश महाजन, किरण चौधरी, दर्शन ढाकणे, सहाय्यक फौजदार विनयकुमार देसले, सुनील चौधरी, कॉन्स्टेबल अशोक फुसे, हेड कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, जमील खान, कॉन्स्टेबल रवींद्र पाटील, भूषण मांडोळे, आसीफ पिंजारी, भरत डोळे यांनी केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुुरु होते.

Deshdoot
www.deshdoot.com