वरणगावात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

सहा जणांना अटक
वरणगावात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड
Crime

वरणगाव| Varangaon वार्ताहर

येथील पिंपळमळ्यात असलेल्या खळ्यात जुगाराचा अड्डा Gambling den सुरू होता. जिल्हा अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव वाचक शाखेच्या Jalgaon Reader Branchपोलिस पथकांने धाड टाकण्याची घटना सांयकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. जुगार खेळतांना While gambling तीन हजार रुपये मिळून आले असून सहा जणांना अटक Six arrested करण्यात आली असून यात एक पोलिस जखमी झाल्याचे सांगण्यात येते.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव वाचक शाखेचे पथक सहाय्यक पोलिस निरिक्षक सिध्देश्वर आखेगावकर, पीएसआय सुनील चौधरी, सहाय्यक फौजदार शांताराम वानखेडे, हे. कॉं. प्रविण पाटील, हे. कॉं. जमिल रवान, हे.कॉं. रविंद्र पाटील, हे. कॉं. आसिफ पिंजारी, हे.कॉं. भरत डोके या पथकाने वरणगाव शहरातील पिंपळमळा भागात जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक यांना मिळाल्याने त्याच्या आदेशाने जुगार अड्डयावर धाड टाकण्यात आली

यात आरोपी राजेंद्र बळीराम चौधरी, संतोष पाडूरंग इंगळे, हसन शेख कादर, शेख असलम शेख अकबर, मुकुंदा राजाराम इंगळे, पदमाकर गोपाळ पाटील (सर्व रा. वरणगाव) यांना अटक करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com