जिल्ह्यातील 316 पदोन्नतीप्राप्त कर्मचार्‍यांच्या आनंदावर विरजण

आठवड्याभरातच पदोन्नतीचे आदेश रद्द; खुल्या प्र-वर्गातील कर्मचार्‍यांना मिळणार पदोन्नती
जिल्ह्यातील 316 पदोन्नतीप्राप्त कर्मचार्‍यांच्या आनंदावर विरजण

अमोल कासार - Jalgaon - जळगाव :

जिल्हा पोलीस दलात पहिल्यांदाच एकाचवेळी 316 कर्मचार्‍यांना जंम्बो पदोन्नती झाली होती. यानुसार त्यांना आहेच त्याठिकाणी पदोन्नतीवर नियुक्तीही देण्यात आली होती.

डॉ. प्रवीण मुंढे
डॉ. प्रवीण मुंढेDr. Praveen Mundhe

शासनाने 21 रोजी आदेश काढून झालेली पदोन्नतीचे प्रक्रिया रद्द करण्याचे निर्देश दिले होते. या आदेशानुसार जिल्ह्यातील 316 कर्मचार्‍यांना देण्यात आलेली पदोन्नती रद्द करुन त्याबाबतचे आदेशही पारित केले आहे.

डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक

मात्र पदोन्नतीचे आरक्षण रद्द करण्याचा खोडा राज्य शासनाने घातला. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी अवघ्या आठवड्याभरातच पदोन्नतीच्या आदेश रद्द केले असून पदोन्नती मिळालेल्या कर्मचार्‍यांच्या आनंदावर विरजन पडले आहे. शासनाने याबाबतचे आदेश काढून संबंधित प्रक्रिया रद्द करण्याचे निर्देश दिले आहे.

सेवा ज्येष्ठनुसार पात्र पोलीस नाईक, पोलीस कॉन्स्टेबल तसेच पोलीस हवालदार या कर्मचार्‍याची पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात आली.

त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या जिल्ह्यातील 316 पोलिस कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीचे जम्बो आदेश पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी 16 एप्रिल रोजी काढले होते.

ही जिल्हा पोलिस दलातील जम्बो पदोन्नती असल्याने यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी या प्रक्रियेसाठी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, कार्यालय अधीक्षक नागेश हडपे, आस्थाना शाखेतील दीपक जाधव, सुनील निकम यांच्या कमिटीने अहोरात्र मेहरत घेत कर्मचार्‍यांना पदोन्नती दिली होती.

त्यामुळे जळगाव शहरातील पोलीस ठाण्यांसह जिल्हाभरातील सर्वच पोलीस ठाणे, तसेच स्थानिक गुन्हे शाखा, तसेच पोलीस दलाशी संलग्नित इतर शाखांमधील कर्मचार्‍यांचा समावेश असल्याने कोरोनाच्या काळात पदोन्नती मिळाल्याने हे कर्मचारी आनंदात होते.

अशी झाली होती पदोन्नती

पोलीस अधीक्षकांना 16 एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व प्र-वर्गातील 316 कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीचे आदेश काढले होते. त्यानुसार 94 कर्मचार्‍यांना पोलीस हवालदार पदावरुन सहाय्यक फौजदार पदी पदोन्नती देण्यात आली आहे.

तर 100 कर्मचार्‍यांना पोलीस नाईकपदावरुन पालीस हवालदारपदी तर 122 कर्मचार्‍यांना पोलीस कॉन्स्टेबल पदावरुन पोलीस नाईक पदी नियुक्ती देण्यात आली होती.

परंतु अवघ्या आठवड्याभरातच 20 एप्रिल रोजी शासनाने ही प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश काढले. या आदेशानुसारच आज पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी 316 कर्मचार्‍यांची पदोन्नती रद्द केल्याबाबतचे आदेश पारित केले आहे.

खुल्या प्र-वर्गातीलच कर्मचार्‍यांना पदोन्नती

पदोन्नतीच्या आक्षणाच्या आदेशाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने पदोन्नतील आरक्षण अवैध ठरविले असून कोट्यातील आरक्षित पदे रिक्त ठेवून खुल्या प्रवर्गातील सर्व रिक्त पदे सेवा ज्येष्ठतेनुसार भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.

मागासवर्गीय कर्मचारी वेटींगवर

शासनाने नुकत्याच काढलेल्या आदेशानुसार खुल्या प्रवर्गातील कर्मचार्‍यांना पदोन्नती दिली जाणार आहे. त्यामुळे सर्व जाती प्र-वर्गातील मागासर्गीय कर्मचार्‍यांना पदोन्नतीसाठी प्रतिक्षाच करावी लागणार आहे. मात्र यात ज्या मागासवर्गीय अधिकारी व कर्मचार्‍यांची पदोन्नतील आरक्षणाचा लाभ घेवून सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नतीवर आले आहे किंवा 25 मे 2004 रोजी किंवा त्यापूर्वी सेवेत रुजू झाले आहेत. तेच कर्मचारी सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीसाठी पात्र ठरणार असल्याचे आदेश शासनाने काढले आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com