यावल : मनवेल येथील पोलिस पाटील निलंबीत
जळगाव

यावल : मनवेल येथील पोलिस पाटील निलंबीत

लॉकडाऊन काळातील सभेची माहिती न दिल्याने कारवाई

Rajendra Patil

यावल - प्रतिनिधी - Yaval

उपविभागीय अधिकारी फैजपूर यांनी दिलेल्या आदेशानुसार यावल तालुक्यातील मनवेल येथील पोलिस पाटील सुरेश राजधर भालेराव यांना निलंबीत करण्यात आले आहे.

पोलिस पाटील यांनी गावात लॉकडाऊन काळात दि.१४ जून २०२० रोजी श्रीमती प्रतिभा मोरे रा.फैजपूर (जळगाव जिल्हा अनु.जाती जमाती महिला अध्यक्ष) यांनी विनापरवानगी व बेकायदेशिर रित्या ६० ते ७० कार्यकर्त्यांसह कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर व संचारबंदी काळात मास्क न लावता सभा घेतली.

सदर सभेबाबत यावल पो.स्टे.मध्ये कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. यासंदर्भात पोलिस पाटील या नात्याने भालेराव यांनी पो.स्टे. ला माहिती देणे अपेक्षीत होते व सदर सभेवर आक्षेप घेतलेला नसल्याने या गुन्हयात पोलीस पाटील यांनाही आरोपी करण्यात आले आहे.

पो.पा.सुरेश भालेराव यांना तहलिस कार्यालयाने यासंदर्भात कारणे दाखवा नोटीस दिली होती. नोटीसीचा खुलासा केलेला नाही. त्यामुळे पोलीस पाटील मनवेल यांना पुढील आदेशपावेतो तत्काळ निलंबीत केले असल्याचा आदेश डॉ.अजित थोरबोले, उपविभागीय अदिकारी फैजपूर भाग फैजपूर यांनी दिला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com