कोरोना योध्दा : पोलीस पाटलाच्या वारसास मिळाला ५० लाखाचा धनादेश

सेवानिवृतीच्या १२ तास आधीच कोवीडमुळे झाला होता मृत्यू
कोरोना योध्दा : पोलीस पाटलाच्या वारसास मिळाला ५० लाखाचा धनादेश

यावल - प्रतिनिधी Yaval

येथील पोलीस पाटील मिलीद गजरे यांचे गेल्या वर्षा कोवीड बंदोबस्त करतांना आजारी पडुन निधन झाल्या प्रकरणी शासनाकडुन त्यांचे वारसाला ५० लाख रुपयांचा धनादेश त्यांचे वारसदार श्रीमती मीना मिलीद गजरे यांना पोलीस स्टेशनमध्ये फैजपूर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग यांचे हस्ते देण्यात आला.

याप्रसंगी डी.वाय.एस.पी. नरेंद्र पिंगळे, यावल पो. स्टे. पोलीसनिरीक्षक सुधीर पाटील, खान्देश विभाग पो.पा.अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, तालुका पो.पा. संघटना तालुका अध्य अशोक पाटील व सहकारी उपस्थीत होते.

पोलीस पाटील संघटने तर्फे याचा पाठ पूरावा करण्यात आला . पोलीस पाटील मिलींद गजरे यांचे गेल्या वर्षी मे २०२० मध्ये सेवानिवृत होणार होते. सेवानिवृतीच्या अवघ्या १२ तास आधीच त्यांचा को वीडमध्ये मृत्यू झाला होता.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com