जिल्ह्यातील दोघा पोलीसांना पोलीस पदक जाहीर
जळगाव

जिल्ह्यातील दोघा पोलीसांना पोलीस पदक जाहीर

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस पदकांची घोषणा गृह विभागामार्फत करण्यात आली . महाराष्ट्रातील 58 पोलिसांना हे पदक जाहीर झाले आहे. यात जळगाव जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकार्‍यांचा समावेश आहे.

चाळीसगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र सारंधर रनमाळे आणि जळगाव पोलीस विभागीय कार्यालयातील सहाय्यक उपनिरीक्षक सुनील शामकांत पाटील यांना ही पदके जाहीर झाली आहेत

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. यावर्षी 926 पोलीस पदके जाहीर झाली असून 80 पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक 215 पोलिसांना पोलीस शौर्य पदक आणि 631 पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी पोलीस पदक जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला 58 पदके मिळाली आहेत.

पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र सारंधर रनमाळे आणि सहाय्यक उपनिरीक्षक सुनील शामकांत पाटील या दोन्ही पोलीस अधिकार्‍यांचे पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधिक्षिक भागश्री नवटके, सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी अभिनंदन केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com