बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाचे पथसंचलन
जळगाव

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाचे पथसंचलन

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरात येऊ घातलेल्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पोलीस स्टेशनच्यावतीने पोलीसांनी पथसंचलन केले. शहरातील संवेदनशील असलेल्या भागातून पोलीसांनी शक्ती प्रदर्शन केले.

तांबापूरा, शेराचौक, मेहरूण, सिंधी कॉलनी, शनी पेठ, काट्या फाईल, इस्मालपुरा, जुने जळगाव, कोळी वाडा, जैनाबाद, समता नगर या भागात पथ संचलन करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ निलाभ रोहन, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण निकम, शनी पेठ पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे, एमआयडीसी पोलीस निरीक्षक विनायक लोकरे, जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अकबर पटेल, रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सहाय्यक फौजदार, पोलीस अधिकारी व कर्मचारी आदि सहभागी होते.

Deshdoot
www.deshdoot.com