पोलिस कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात

१५ हजाराची लाच आली अंगाशी
पोलिस कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात

जळगाव-पाळधी - Jalgaon

पाळधी दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कॉन्स्टेबल सुमीत पाटील यास अपघातग्रस्त वाहन सोडण्यासह अपघाताच्या गुन्ह्यातील संशयीत आरोपीला मदत करण्यासाठी मागीतलेल्या १५ हजारांची लाच अंगाशी आली व एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.

तक्रारदाराच्या चालकाकडून काही दिवांपूर्वी अपघात होवून एकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन चारचाकी वाहन जप्त करण्यात आले होते.

सदर वाहन सोडवण्यासह आरोपी चालकाला मदत करण्यासाठी पो.कॉ.सुमीत पाटील यांनी दि.२९ डिसेंबर रोजी लाच मागितलीह होती. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवून सापळा रचण्यात आला व आला असता एसीबीच्या पथकाने आज लाच स्वीकारताच सदर पोलीसास अटक केली. हा सापळा पो.उ.अधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झाला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com