जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

शहरातील पिंप्राळा परिसरातील पांढरी प्लॉट भागात आनंद शंकर पाटील (वय 30) या प्लंबर असलेल्या तरुणाने राहत्या घरात गळफास करुन आत्महत्या केल्याची घटना 24 जानेवारी रोजी सकाळी 9.24 वाजेच्या सुमारास घडली.

आत्महत्येचे नेमके कारण कळू शकलेले नाही. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. पिंप्राळा पांढरी प्लॉट येथे आनंद शंकर पाटील हे पत्नी व दोन मुलींसह वास्तव्यास होते. त्यांची पत्नी आरती ही काही दिवसांपासून पाचोरा तालुक्यातील एका गावात माहेरी गेली आहे.

रविवारी सकाळी पांढरी पट्टी भागातील नागरिक घरी आला असता, आनंद याने गळफास घेतल्याचे दिसून आले. यानंतर त्याने शेजारीच राहणार्या आनंदचा भाऊ यास प्रकार कळविला. त्यांनी तातडीने त्याला जिल्हा रुग्णालयात हलविले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ संदीप पाटील यांनी त्यास मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळाल्यावर रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हे.काँ. लिलाधर महाजन यांनी पंचनामा केला. तसेच शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेेवाईकांच्या ताब्यात दिला. वैद्यकीय अधिकारी डॉ संदीप पाटील यांच्या खबरीवरुन पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस लिलाधर महाजन हे करीत आहेत.