पिंपळवाड म्हाळसा विकास सोसा ५१ लाखांची अफरातफर

पिंपळवाड म्हाळसा विकास सोसा ५१ लाखांची अफरातफर

चेअरमन, सचिवसह १७ जणांवर गुन्हा दाखल

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

तालुक्यातील पिंपळवाड म्हाळसा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीतील संचालक मंडळाने जवळपास ५१ लाख २९ हजार ६१२ रुपयांची अफरातफर केल्याचे उघड झाल आहे. या प्रकारणी मेहुणबारे पोली स्टेशनला वि. का. संस्थेचे सचिव, चेअरमन आणि संचालक मंडळ अशा १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पिंपळवाड म्हाळसा विविध कार्यकारी सोसायटीतील दि. १४/२०१५ ते दि. ३१/१२/२०२० पावेतो असलेल्या संचालक मंडळाने संस्था सभासदांना कर्ज येणे बाबत दाखले दिले. बेकायदेशी परस्पर कर्ज वाटप दर्शवून रकमेचे चेक व विड्रॉलवर खोट्या बनावट सह्या करुन कर्ज रकमेची रक्कम स्वत:चा फायदा करुन घेतला. कर्ज खतावणीला येणे कर्ज वाक्यामध्ये खाडा-खोड व गीरवा-गिरव करुन प्रत्यक्षात कर्ज वसूली रजिस्टर व रोजकिर्दला वसूली जमा केली. परंतू बँकेत प्रत्यक्षात चेक वटलेले असतांना, चेक जमा बाबत खोट्या नोंदी करुन यात दर्शविलेली बोगस कर्जाच्या वसूलीच्या खोट्या नोंदी करुन घेतला.

कर्ज बाबत २३ लाख २३४३ रुपयांचा तर खत दुकान रोज किर्द व मुख्य विभाग रोज किर्द यावरुन प्रत्यक्षात खत विक्री झालेल्या मालाची रोक रक्कम प्रत्यक्षात बँकेत भरणा न करता इतर येणे व्यवहार दर्शवून २ लाख ३३ हजार ४६० रुपये तसेच सोसायटीची इमारत बांधकाम तसेच दुरुस्तीचे कामकाज झालेले नसतांना, खर्चा पोटी १० लाख ८ हजार रुपये यासह अन्य बाबींमध्येही जवळपास एकूण ५१ लाख २९ हजार ६१२ रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार लेखा परीक्षक श्री. वळवी यांनी मेहूणबारा पोलीसांत दिली आहे.

याप्रकरणी मेहूणबारे पोलीसांनी पिंपळवाड म्हाळसा विविध कार्यकारी सोसायटीचे वासुदेव भिका माळी, दिगंबर मोतीराम पाटरल, कैलास सजन चौधरी, प्रकाश रामचंद्र माळी, सौ. बेबाबाई सुपडू माळी, ेशेनपडू दोधा पाटील, एकनाथ पाटील, चिंतामण हरी अहिरे, दयाराम दगा माळी, लक्ष्मण जयराम माळी, सखाराम मोतीराम तिरमली, सुकदेव नारायण पाटील, सौ. शोभा रमेश पाटील, रामचंद्र पाटील(सचिव) तसेच क्षेत्रीय बँक अधिकारी आर. एल. वाघ, पी. पी. साळुंखे, डी. यु. पवार अशा एकूण १७ जणांच्या विरोधात र. नं. ११५/२०२१ भादवी कलम ४२०, ४१८, ४०९, ४६८, ४७१, ४७७ अ, ३४ प्रमाण गुन्हां दाखल केला आहे. पुढील तपास मेहूणबारा पोलीस स्टेशनचे ए. पी. आय. पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एस. आय. हेमंत शिंदे हे करीत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com