गजानन हॉस्पिटल येथे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच रुग्णाचा मृत्यू

गजानन हॉस्पिटल येथे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच रुग्णाचा मृत्यू

नातेवाईकांचा आरोप; कारवाईची मागणीसाठी मृतदेह ताब्यात न घेण्याचा पावित्रा

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरातील गजानन हॉस्पिटल येथे काल शनिवारी तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथील चावदस शंकर ताडे (बारी) वय 55 यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले.

रुग्ण ताडे 15 दिवसांपासूनच व्हेंटीलेटरवर होते. त्यांना काल आमच्या रुग्णालयात हलवितांना त्यांची ऑक्सिजन पातळी 38 एवढी होती. उपचार सुरु केल्यानंतर ऑक्सीजन पातळी 90 ते 95 पर्यंत वाढली. व्हेंटीलेटर उपलब्ध होते, मात्र त्याची आवश्यकता नसल्याने ते लावण्यात आले नाही. आज सकाळी त्यांची हृदयक्रिया बंद पडली. हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला नसल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगत, ताडे यांना रात्रीच्या वेळी एक इंजेक्शन देण्यात आले, मात्र त्याचीही कुठलीही रिअ‍ॅक्शन झालेली नसल्याचे सांगितले.

डॉ. विवेक चौधरी, संचालक, गजानन हॉस्पीटल

कर्मचार्‍यांनी कुठलेतरी इंजेक्शन दिल्याने त्याच्या हाय पॉवरमुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांना व्हेंटीलेटरची आवश्यकता असतांनाही व्हेेंटीलेटर लावण्यात आले नाही. डॉक्टरांना विचारणा केल्यावर उडवाउडवीचे उत्तरे देण्यात आली. घटनेवेळी यावेळी डॉक्टर हजर नव्हते. त्यांना संपर्क साधल्यावर त्यांनी तीन वेगवेगळ्याप्रकाराची उत्तरे दिली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे भावाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत असून रुग्णालयावर कारवाई करावी अशी मागणी मयत चावदस ताये यांचे भाऊ श्रावण शंकर ताडे यांनी केली.

शंकर ताडे, मयताचे नातेवाईक

आज रविवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास प्रकृती ठिक होती. यावेळी ते नातेवाईकांशी बोलले. यानंतर दुपारी 1 वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनसह डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे चावदस ताडे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी करत रुग्णालयात गोंधळ घातला. डॉक्टरावर कारवाईची मागणीसाठी नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात न घेण्याचा पावित्रा घेतल होता.

दरम्यान याबाबत गजाजन हॉस्पिटलचे डॉ. विवेक चौधरी यांनी मात्र कुठल्याही हलगर्जीपणामुळे अथवा इजेंक्शन दिल्यामुळे हा मृत्यू झाला नसल्याची माहिती दिली आहे. 15 दिवसांपासून ते व्हेंटीलेटरवरच होते. आज त्यांची हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

...अन् दुपारी मृत्यू

शिरसोली प्र.न. येथील चावदस ताडे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना 11 एप्रिल रोजी जळगावातील आशिर्वाद हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. शनिवारी संध्याकाळी 7 वाजता ताडे यांची प्रकृती खालावल्याने तसेच करोना अहवाल निगेटीव्ह आल्याने नातेवाईकांनी त्यांना गजाजन हॉस्पिटल येथे दाखल केले.

याठिकाणी आज सकाळी ताडे नातेवाईकांशी चांगल्या पध्दतीने बोलले. यानंतर दुपारी ताडे यांची प्रकृती खालावली. याचदरम्यान ताडे यांचा मृत्यू झाला.

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी गोंधळ घातला. यावेळी जिल्हापेठ पोलिसांनाही पाचारण करण्यात आले होते.

मयत ताडे यांचे गोलाणी मार्केट येथे आशिष प्रिन्टींग नावाचे दुकान होते. त्यांच्या पश्चात पत्नी वंदना, आई गुंताबाई, वडील शंकर हरी ताडे, तीन मुली व एक मुलगा, भाऊ तसेच नातवंडे असा परिवार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com