पारोळा : तामसवाडी धरण फुल्ल
जळगाव

पारोळा : तामसवाडी धरण फुल्ल

बोरी नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा

Rajendra Patil

योगेश पाटील

पारोळा -

तालुक्यातील तामसवाडी येथील बोरी धरणातील पाणलोट भागात काल रात्री मुसळधार पाऊस झालेला असुन धरणाचे सुरक्षितेच्या दृष्टीने पुराचे पाणी नदी पात्रात सोडण्यासाठी धरणाचे दरवाजे उघडून पुराचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

बोरी धरणाची पाणी पातळी 266.50 मी. दुपारी 2.30 वा धरणाचे 02 दरवाजे 0.15 मी ने उघडून (विसर्ग कमी करण्यात आला) 903 क्यूसेस विसर्ग नदी पात्रात सुरु आहे

तरी सर्व बोरी नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. जिवित व वित्त हाणि टाळण्याचे दृष्टीने खबरदारी घेण्यात यावी अशा सुचना प्रशासनाने दिल्या आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com