कर्जमाफीचा घोळ; प्रशासनाच्या जीवाला घोर ; कराडीत कनेक्टिव्हिटी फेल ,यंत्रणा छतावर
जळगाव

कर्जमाफीचा घोळ; प्रशासनाच्या जीवाला घोर ; कराडीत कनेक्टिव्हिटी फेल ,यंत्रणा छतावर

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेत पारोळा तालुक्यातील कराडी व यावल तालुक्यातील हिंगोणा गावातून कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र सोमवारी वितरीत करण्यात आले. मात्र, कराडी गावात कनेक्टिव्हिटीसाठी प्रशासनाने संगणकासह सर्व साहित्य घेऊन तीन ठिकाणे बदलली. त्यानंतर 3 तासांच्या प्रतीक्षेनंतर 101 पैकी केवळ 10 शेतकर्‍यांना तीन तासांत कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र मिळाले. ते घराच्या छतावर गेल्यावर कनेक्टिव्हिटी मिळाल्यानंतर प्रमाणपत्र वाटप झाले. सायंकाळपर्यंत 71 शेतकर्‍यांना प्रमाणपत्र दिले गेले. तर हिंगोणा येथे 120 शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यात आली. महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेसाठी सोमवारी प्रमाणपत्र वितरण करण्यात येणार असल्याने प्रशासनाने तयारी पूर्ण केली. परंतु, इंटरनेटची कनेक्टिव्हिटी नसल्याने प्रशासनाची तयारी अपूर्ण पडली. सुरुवातीला कराडी ग्रामपंचायतीत यादीचे वाचन करण्यात आले. परंतु, इंटरनेटची कनेक्टिव्हिटी नसल्याने स्वस्त धान्य दुकानात संगणक, प्रिंटर इतर साहित्य घेऊन प्रशासन पोहचले. परंतु, त्याठिकाणी कनेक्टिव्हिटी मिळाली नाही. त्यामुळे दुसर्‍या व तिसर्‍या ठिकाणी प्रशासन पोहचले. परंत्या त्यानंतरही कनेक्टिव्हिटी मिळाली नाही. शेवटी राजेंद्र पाटील यांच्या घरी साहित्य नेले. त्याठिकाणी कनेक्टिव्हिटी मिळताच देवचंद वानखेडे यांचे ऑनलाइन काम करुन प्रमाणपत्र देण्यात आले. विशेष म्हणजे कनेक्टिव्हिटीसाठी घराच्या छातावर जावे लागले. चौथ्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी मिळाल्यानंतर लाभार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. परंतु, संध्याकाळपर्यंत 71 जणांच प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.

Deshdoot
www.deshdoot.com