भुसावळ ( प्रतिनिधी) bhusawal -

पं. स. च्या दुसर्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात महिला राखीवपद निघाल्यानंतर मनीषा पाटील यांना सभापतीपदाची संधी मिळाली होती तर उपसभापती पदी वंदना उन्हाळे यांची निवड झाली होती.

१ फेब्रुवारी रोजी दोन्ही पदाधिकार्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यासाठी रिक्त झालेल्या सभापती व उपसभापती पदी १६ रोजी निवड होणार आहे.

पं.स. सभापतिपदी अडीच वर्षानंतरच्या दुसर्या टर्ममध्ये भाजपच्या मनीषा पाटील यांना संधी मिळाली होती. पूर्वी ठरल्याप्रमाणे त्यांनी दीड वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर १ रोजी त्यांनी सभापतीपदाचा राजीनामा जि.प. अध्यक्षांकडे दिला होता तर उपसभापती वंदना उन्हाळे यांनीही राजीनामा दिला होता.

आगामी तब्बल एक वर्षासाठी त्यांना सभापती पदाची संधी मिळेल तर उपसभापतीपदी म्हणून माजी सभापती प्रीती मुरलीधर पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान जि.प. मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार नुतन सभापती निवडीपर्यंत सभापतीपदाचा पदभार जि.प. सभापती जयपाल बोदडे यांच्याकडे देण्यात आला आहे.

रिक्त झालेल्या दोन्ही जागांवर १६ रोजी पं. स. सभागृहात येथे दुपारी तीन वाजता निवड होणार आहे. सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत यासाठी अर्ज स्वीकारण्यात येतील. पीठासन अधिकारी म्हणून तहसिल दिपक धीवरे हे काम पाहतील.

यापूर्वी सभापती पदावर सुनील महाजन, प्रीती पाटील, मनिषा पाटील यांना संधी मिळाली आहे. त उपसभापती पदावर मनीषा पाटील, वंदना उन्हाळे तर प्रीती पाटील यांना दुसर्यांदा संधी मिळत आहे.

पं.स.मध्ये भाजपाचे चार, राष्ट्रवादी व शिवसेना प्रत्येकी एक-एक सदस्य आहेत. त्यात भाजपाचे सुनील महाजन, प्रीती पाटील, मनीषा पाटील, वंदना उन्हाळे, राष्ट्रवादीच्या आशा निसाळकर तर शिवसेनेचे विजय सुुरवाडे यांचा समावेश आहे.