पंचायत राज समिती जिल्हा परिषदेत दाखल

जिल्हा परिषदेकडून विभागनिहाय आढावा घेण्याची काम सुरु
पंचायत राज समिती जिल्हा परिषदेत दाखल

जळगाव - Jalgaon

राज्याची पंचायतराज समिती सोमवारी जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीमध्ये सकाळी ११.५५ वाजता दाखल झाली असून जिल्हा परिषदेकडून समितीचे अध्यक्ष ना. संजय रायमुलकर यांचे स्वागत जि.प.सीईओ डॉ.पंकज आशिया (CEO Dr. Pankaj Asia), उपमुख्यकार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, कॅफो विनोद गायकवाड यांनी केले.

सानेगुरुजी सभागृहात पंचायती राज समिती सदस्यांचे आगमन झाले असून जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख, जिल्ह्यातील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी,सहाय्यक गटविकास अधिकार्‍यांकडून विभागानिहाय सन २०१६-२०१७ च्या लेखा परीक्षण अहवाल आणि २०१७-२०१८ च्या वार्षिक प्रशासन अहवालाच्यासंदर्भात विभागनिहाय आढावा घेण्याचे काम सुरु आहे.

दरम्यान, यापूर्वी पंचायती राज समितीचे अध्यक्ष ना.संजय रायमुलकर यांचे स्वागत आमदार किशोर पाटील यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद गटनेते रावसाहेब पाटील यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास चव्हाण आदी उपस्थित होते. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिष्टमंडळाने केले. यात जि.प.अध्यक्षा ना.रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, शिक्षण सभापती रवींद्र पाटील, शिवसेनागटनेते रावसाहेब पाटील,उपगटनेते नानाभाऊ महाजन, मधुकर काटे, आमदार किशोरआप्पा पाटील ,माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास चव्हाण आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com