अमळनेर प्रतिनिधी Amalner

इंडोनेशिया व फिलिपाइन्स बांगलादेश या देशांनी पारोळा तालुक्यातील राजवड आदर्शगाव येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापिका पाकीजा उस्मान पटेल यांच्या समाजकार्याची दखल घेऊन आंतरराष्ट्रीय पुरस्काराने त्यांना सन्मानित केले.

यामुळे जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून जिल्ह्याचे नाव जगाच्या नकाशावर चांगलेच अधोरेखित झाले. संपूर्ण जगावरती कोरोना महामारी संकटाचा विळखा असताना आपल्या देशातही टाळेबंदी करण्यात आली होती. शासनस्तरावरून कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून वारंवार आवाहन करण्यात आले. अशा कठीण प्रसंगी जनतेचे प्रबोधन व्हावे या कर्तव्य भावनेतून जागृत करण्याचे महान कार्य केले.

त्या कार्याची दखल देशातील नामांकित सेवाभावी संस्थांनी घेत अनेक पुरस्कारांनी पटेल यांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याने आणि भारतातील प्रत्येक राज्याने त्यांना अनेक सन्मानाने गौरविले आहे. हे गौरवित असताना एक त्याच्या पुढची पायरी म्हणूनच देशातच नव्हे तर बाहेर इंडोनेशिया, फिलिपाइन्स, बांगलादेशाने त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. या पुरस्कारांनी पटेल यांचा झाला सन्मान रॉयल ऑफ मानुबन किंग्डम वेस्ट टाइमर इंडोनेशिया या जागतिक संस्थेमार्फत ग्रेट सोशल वर्क हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार तसेच इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिप अँड पीस मनिला फिलिपाईन्स या संस्थेतर्फे बेस्ट लीडर्स ऑफ द नेक्स्ट जनरेशन या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले व एक्सेस ऑफ ह्यूमन राइट्स इंटरनॅशनल बांगलादेश या संस्थेमार्फत ह्युमॅनिटी अँड पेट्रोटिझम अवार्ड 2020 या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.