पहूर येथील शेतात आढळला अजगर
जळगाव

पहूर येथील शेतात आढळला अजगर

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

पहूर, ता.जामनेर  (वार्ताहर )

पहूर कसबे येथील शेतकरी फकीरा नथू घोंगडे यांच्या शेतात भला मोठा अजगर  आढळल्याने नागरीक भयभीत झाले.

शेतात मोठा अजगर  आढळल्याने सरपमित्रा च्या साह्याने अजगर याला  पकडून जामनेर येथील राम वनात जंगलात सुखरूप सोडण्यात आले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की  पहूर कसबे येथील फकीरा नथू घोंगडे यांच्या देवळी गोगडी शिवारातील शेतात आज भला मोठा अजगर आढळून आल्याने शेतकरी भयभीत झाले. या  अजगराला पाळधी  येथील सर्पमित्र नानाभाऊ  माळी यांनी अजगरला पकडून वन विभाग अधिकारी संदीप पाटील यांच्या सहकार्याने जामनेर येथील राम वनातील जंगलात अजगर याला सुखरूप सोडून देण्यात आले पहूर शिवारात पहिल्यांदाच भलामोठा अजगर दिसल्याने गावकऱ्यांनी पाहण्यासाठी फार मोठी गर्दी केली होती

Deshdoot
www.deshdoot.com