केशरानंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्रकल्प

केशरानंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्रकल्प

दररोज 60 सिलिंडर ऑक्सिजन मिळणार, आठ दिवसात उभारण्यात आला प्रकल्प

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

करोनाबाधित रुग्णांच्या सोयीसाठी शहरातील केशरानंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्याचा प्रकल्प आठ दिवसात उभारण्यात आला आहे.

या प्रकल्पातून दररोज साठ सिलिंडर ऑक्सिजन मिळणार आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना त्याचा लाभ होईल. अशी माहिती हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक ज्ञानेश्वर भामरे यांनी दिली आहे.

शहरातील मालेगाव रोडलगत असलेल्या केशरानंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी विशेष कक्ष निर्माण करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे अनेक बाधित मृत पावले.

केंद्र सरकारने निरनिराळ्या उद्योगांमधील ऑक्सिजनचा वापर प्रतिबंधीत केला. केवळ रुग्णांसाठी ऑक्सिजनचा वापर करावा, असे निर्देश शासनाने दिले आहेत.

या पार्श्वभुमीवर खासगी रुग्णालयांनी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारुन रुग्णांना प्रभावी सेवा द्यावी, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.

त्या अनुषंगाने केशरानंद मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक ज्ञानेश्वर भामरे आणि डॉ. महेंद्र बोरसे यांनी राज्य सरकारकडे हवेतून ऑक्सिजन निर्माण होवू शकेल असा प्रकल्पाबाबत 20 एप्रिल रोजी प्रस्ताव दिला आणि दहा दिवसात प्रकल्प पुर्ण करु असे यावेळी सांगण्यात आले.

मात्र युध्द पातळीवर यंत्रणा मागविण्यात आली आणि आज शहरातील पहिला हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात अग्रगण्य असलेल्या आर.एन. या कंपनीने हॉस्पिटलच्या टेरेसवर ऑक्सिजन प्रकल्प उभारला.

त्याच्या उदघाटन प्रसंगी डॉ. महेंद्र बोरसे, हेमलता बोरसे यांच्या हस्ते यंत्रणेची पुजा करण्यात आली. याप्रसंगी केशरानंद उद्योग समुहाचे कार्यकारी संचालक ज्ञानेश्वर भामरे, राजेंद्र देसले, जीतू शहा, लाईफ लाईन ऑक्सिजनचे मालक अनिल अग्रवाल, रवीराज भामरे आदी उपस्थित होते. आजपासून दिवसभरात या ठिकाणी ऑक्सिजनचे साठ सिलिंडर निर्माण होतील. त्यामुळे रुग्णांना वेळीच ऑक्सिजनचा पुरवठा होवू शकेल अशी माहिती ज्ञानेश्वर भामरे व डॉ. महेंद्र बोरसे यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com