जनतेसाठी ऑक्सीजन कॉन्सट्रेटर करून दिले उपलब्ध

अंतुर्ली येथील रामभाऊ तराळ संस्थेचा उपक्रम
जनतेसाठी ऑक्सीजन कॉन्सट्रेटर करून दिले उपलब्ध

रावेर|प्रतिनिधी Raver

अंतुर्ली (ता.मुक्ताईनगर)येथील दादासो. रामभाऊजी तराळ शेतकरी सहकारी ग्राहक संस्था आणि दादासो रामभाऊजी तराळ दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या माध्यमातून अंतुर्ली ते उचंदे परिसरातील नागरिकांसाठी ऑक्सिजन कॉन्सट्रेटर उपलब्ध करून देण्यात आल्या आहे.

सद्य स्थितीत देशात कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर जीवनरक्षक ठरत आहेत. त्यामुळे यामशीन्सचा तुटवडा जाणवत आहे.मात्र नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय घेऊन दोन्ही संस्थेने

ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन खरेदी केल्या आहे.यामुळे परिसरातील रुग्ण व त्यांच्या परिवारातील सदस्यांना या साठी पळापळ करावी लागणार नाही. खरेदी केलेल्या ऑक्सिजन कॉन्सट्रेटरचे लोकार्पण दोन्ही संस्थाचे सभापती सुधीर तराळ , उपसभापती वसंतराव पाटील, जिपचे माजी गटनेते तथा माफदाचे अध्यक्ष विनोद तराळ, चेअरमन बाळू महाजन,माजी सरपंच भाऊराव पाटील, माजी सभापती नीलकंठ महाजन, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते साहेबराव सिंगतकर, माजी चेअरमन प्रल्हाद दवंगे, विलास पाटील, माजी सरपंच सुनील पाटील, संदीप ठोंबरे, जनता शिक्षण प्रसारक मंडळ उपाध्यक्ष शेख भैयाजी, पुंडलिक धायले ,बाळू शामराव पाटील,मॅनेजरउत्तम महाजन ,सेक्रेटरी विजय धनगर यांच्या उपस्थित करण्यात आले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com