भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे मोफत ऑक्सिजन कंसेंटेटर उपलब्ध

भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे मोफत ऑक्सिजन कंसेंटेटर उपलब्ध

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

गेल्या दीड वर्षांपासून सर्व नागरिक करोनासारख्या आजाराला धीराने तोंड देण्याचा प्रयत्न करीत आहेत. या आजारात अनेकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

गेल्या काही दिवसात रुग्णालयात बेड न मिळणे, ऑक्सिजन कंसेंटेटर उपलब्ध न होणे, जीवरक्षक औषधी व इंजेक्शनचा तुटवडा यामुळे अनेक कुटुंबाने जिवाभावाची माणसं गमावली आहेत.तर अजूनही असंख्य लोकांची विविध प्रकारच्या उपचारासाठी धावपळ सुरु आहे. आज गृह विलगीकरणात असलेल्या बर्‍याच रुग्णांना ऑक्सिजन कंसेंटेटरची गरज आहे आणि ही गरज पूर्ण करता यावी यासाठी भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशन आणि विनमार ओव्हरसीज पॉलीमर्स प्रा.लि.मुंबईच्यावतीने 25 ऑक्सिजन कंसेंटेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

मशीन कांताई नेत्रालयात उपलब्ध राहणार असून ज्या रुग्णांना याची गरज भासेल, त्यांनी रुग्णास ऑक्सिजनची गरज असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र, किती लिटर ऑक्सिजनची गरज आहे त्याचा तपशील ज्या रुग्णासाठी हवे आहे त्यांचे आधारकार्ड, पूर्ण पत्ता व इतर आवश्यक तपशील मशीन नेणार्‍याचे आधारकार्ड, ओळख असणार्‍या व्यक्तीचा संपूर्ण तपशील सादर करणे गरजेचे असेल.

या फौंडेशनच्या वतीने मोफत दिली जाणारी ऑक्सिजन मशीन ही 5 लिटर क्षमतेची असणार आहेत. रुग्णास लागणार्‍या ऑक्सिजन कंसेंटेटरची गरज नसल्याचे चित्र लक्षात आल्यावर हे ऑक्सिजन कंसेंटेटर कांताई नेत्रालयास परत करावयाचे आहे.

ऑक्सिजन कंसेंटेटर अभावी कोणत्याही रुग्णास आपला जीव गमवावा लागू नये याच भावनेतून भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशनच्या वतीने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ऑक्सिजन कंसेंटेटरची गरज असणार्‍या रुग्णाच्या नातेवाईकांनी ऑक्सिजन कंसेंटेटरच्या उपलब्धते बाबत विजय मोहरीर (9423774346), सुधीर पाटील (9823362330), उदय महाजन (9422776708), अनिल जोशी (9432594487), नितीन चोपडा (9423489824), अमर चौधरी (9372409468) डॉ. प्रदीप ठाकरे (9422775906) कांताई नेत्रालय, निमखेडी रोड येथे संपर्क करावा असे आवाहन फौंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनचे दातृत्व

जैन उद्योग समुहाचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी 1982 मध्ये सामाजिक उत्तरदायित्व जबाबदारी म्हणून जैन चॅरिटीज् ची स्थापना केली. ही संस्था आता कालांतराने भवरलाल अँड कांताबाई फौंडेशन अशी नोंदणीकृत झाली. समाजाला प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, अध्यात्म, पर्यावरण आणि जीवनावश्यक बाबी इत्यादी करीता मदतीची आवश्यकता असते. ही संस्था विविध जाती धर्माच्या गरजू, आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्यांना निरपेक्ष भावनेने मदत करीत असते. दातृत्वाचा हा वसा मोठेभाऊ अर्थात भवरलालजी जैन यांच्याकडून पुढच्या पिढीस मिळाला असून या संस्थेची व्याप्ती व कार्य वाढलेले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com