700 ऑक्सिजनचे बेड शिल्लक !

जिल्ह्यात बेड नियंत्रण कक्षामुळे थांबली रुग्णांच्या नातेवाईकांची फरफट
700 ऑक्सिजनचे बेड शिल्लक !

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

राज्यासह जिल्ह्यात करोनाच्या दुसर्‍या लाटेने हाहाकार माजविला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी करोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचे बेड मिळत नसल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता.

परंतु गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सातशेपेक्षा अधिक ऑक्सिजनचे बेड शिल्लक असल्याने ही बाब जळगाववासीयांसाठी दिलासा देणारी आहे.

जिल्ह्यासह राज्यात करोनाचा उद्रेक सुरुच आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत असून बरे होणार्‍यांची संख्या देखील आता वाढू लागली आहे.

परंतु मृत्यू होणार्‍यांची संख्या कमी होत नसल्याने ही बाब चिंतेची ठरत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात रुग्णांची संख्येत वाढ होत असल्याने जिल्ह्यात शासकीय कोविड रुग्णांलयासह खासगी रुग्णात बेड मिळणे अवघड झाले होते.

जिल्हयात 135 खासगी व शासकीय रुग्णलये असून याठिकाणी 5 हजार 362 बेड देखील रुग्णांसाठी मिळणे शक्य होत नव्हते.

परंतु आता काही दिवसांपासून वाढत्या रुग्णसंख्येबरोबर बरे होणार्‍यांची संख्या देखील वाढू लागली असल्याचे जळगावकरांसाठी ही समाधानाची बाब ठरु लागली आहे.

जिल्ह्यात कोविड रुग्णालयात 1 हजार 589 बेड रिकामे

गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोनाने प्रचंड कहर माजविला होता. शासकीयसह खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी बेडच शिल्लक नसल्याने एकाबेडवर दोन रुग्णांवर उपचारा केले जात असल्याची स्थिती देखील निर्माण झाली होती. परंतु आता जिल्ह्यात 1 हजार 589 बेड शिल्लक आहेत. त्यामुळे जळगावकरांही बाब अत्यंत दिलासादायक ठरणार आहे.

ऑक्जिसनच्या बेडची वणवण थांबली

कोरोनाबाधित रुग्णाच्या शरिरातील ऑक्सिजनची पातळी खालावल्यानंतर रुग्णालया ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. काही दिवसांपूर्वी ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णालया ऑक्सिजनच्या बेडसाठी वणवण भटकावे लागत होते.

परंतु आता जिल्हाभरात ऑक्सिजनचे सुमारे सातशेपेक्षा अधिक बेड शिल्लक असून जिल्ह्यात 10 व्हेंटीलेटर देखील आता शिल्लक आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील कंट्रोल रुमची भूमिका महत्वाची

जिल्ह्यात शासकीयसह खासगी 135 डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलला कोरोनाबाधित रुग्णांवर उपचाराला मंजूरी देण्यात आली आहे.

कुठल्या हॉस्पिटलला किती ऑक्जिसन बेड, व्हेंटीलेर्ट्स आहे याबाबतची संपूर्ण अपडेट माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील बेड नियंत्रण कक्षातून अपडेट केली जाते.

हा नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यान्वयीत असल्याने या नियंत्रण कक्षामूळे जिल्ह्यातील रुग्णांची फरफट थांबली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com