भुसावळ : आयुध निर्माणीत कर्मचार्‍यांचा आक्रोश

काळा दिवस : केंद्र सरकारच्या खाजगिकरणाच्या प्रस्तावाला विरोध
भुसावळ : आयुध निर्माणीत कर्मचार्‍यांचा आक्रोश
भुसावळ आयुध निर्माणीत निदर्शने करताना कर्मचारी

भुसावळ - प्रतिनिधी - Bhusawal :

सरकारच्या आयुध निर्माणी निगमीकरणाच्या निर्णयाच्या विरोधात १७ रोजी सर्व कर्मचारी मुख्य गेटवर एकवटले व प्रचंड नारेबाजी, प्रदर्शन करीत सरकारचा विरोध दर्शविला.

तिनही संरक्षण फेडरेशनच्या आदेशावरून तात्काळ सरकारचा विरोध दर्शवण्यासाठीसाठी अपील केले गेले होते. स्थानिक संघर्ष संयुक्त संघर्ष समितीद्वारे संयोजक दिनेश राजगिरे यांनी काल सरकारद्वारे अकस्मात घेतलेल्या आयुध कारखान्यांच्या निगमीकरण निर्णयाचा मुख्य गेट वर निषेध व्यक्त केला व आयुध निर्माणीसाठी हा काळा दिवस असल्याचे सांगितले.

फेडरेशनद्वारे सूचना सर्व आयुध निगमीकरण विरोधात स्थापित युनियन व असोसिएशनच्या संयुक्त संघर्ष समितीला करण्यात आल्या की येणार्‍या काळात आपण सरकारच्या विरोधात विविध माध्यमातून विरोध प्रदर्शन करवा.

१९ जूनच्या निर्माणीच्या मुख्यद्वार येथे सरकारच्या निगमीकरण नीतीचा पुतळा दहन करण्याचे निर्देश दिले आहे व सरकारचा द्वारे निगमिकरण निर्णय मागे घेण्यासाठी लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

त्याचप्रमाणे २० जून रोजी संरक्षणाच्या तिनही फेडरेशन एकत्र बैठक करून अविलंब अनिश्चित कालीन संपावर जाण्यासाठी निर्णय घेणार आहेत अशी माहिती श्री दिनेश राजगिरे - मेंबर जेसीएम-३, आयुध निर्माणी बोर्ड कलकत्ता यांनी दिली सर्व कर्मचार्‍यांना एक राहून सरकारच्या निगमीकरण नीतीच्या विरोधात एकत्र लढण्यासाठी अपील केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com