स्थलांतरीत मजुरांना मूळ गावी जाण्याची संधी
जळगाव

स्थलांतरीत मजुरांना मूळ गावी जाण्याची संधी

12 ऑगस्टपर्यंत माहिती भरण्याचे आवाहन

Rajendra Patil

जळगाव-jalgaon

जिल्हयात राहणाऱ्या परराज्यातील मजुरांना आपल्या गावी जायचे असल्यास त्यांनी https://migrant.mahabocw.in/migrant/form या संकेतस्थळावर माहिती भरावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

नियमित रेल्वेसेवा दिनांक 12 ऑगस्ट, 2020 पर्यंत स्थगित असल्याने स्थलांतरीत मजूरांना आपली माहिती 12 ऑगस्ट, 2020 पर्यंत भरता येईल.

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, उर्जा व कामगार मंत्रालयात स्थापित सहाय्यता केंद्राची माहिती व वर्तमान योजनांची माहिती देखील या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. स्थलांतरीत मजुरांनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा प्रशासन व सहाय्यक कामगार आयुक्त, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com