रावेर ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन पाईप सिस्टीम कार्यन्वित

आ.शिरीष चौधरी, प्रांतअधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्या हस्ते उद्घाटन
रावेर ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन पाईप सिस्टीम कार्यन्वित

रावेर | प्रतिनिधी Raver

करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करणे जरुरीचे आहे. सार्वजनिक शिस्त व सोशल डिस्टंन्सिंग पाळून आपले काम धंदे करणे गरजेचे आहे. रावेरात ऑक्सिजन व्यवस्था लोकसहभागातून निर्माण करता आली. यासाठी आपल्या माणसाची दानशुर वृत्तीतून गोरगरीब लोकांचे जीव वाचवू शकते हे खूप मोठे कार्य यातून घडणार आहे. आगामी पाच सहा महिने हा धोका अधिक वाढणार असल्याने, जोपर्यंत व्हॅक्सीन येत नाही तोपर्यंत आपल्याला सामाजिक शिस्त आणि नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार असल्याचे मत आमदार शिरीष चौधरी यांनी व्यक्त केले.

शनिवारी रावेरात ग्रामीण रुग्णालयात लोकसहभागातून मध्यवर्ती ऑक्सिजन पाईप योजना पूर्णत्वास आल्याने त्यांचे उद्घाटन आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रांतअधिकारी डॉ.अजित थोरबोले, तहसीलदार उषाराणी देवगुणे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, नोडल ऑफिसर एन.डी.महाजन, नायब तहसीलदार संजय तायडे उपस्थित होते. यावेळी ऑक्सिजन पाईप योजनेसाठी वर्गणी दिलेल्या तसेच कोविंड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्माण केलेल्या डेडीकेट कोविंड हॉस्पिटल व कोविंड सेंटर उभारणीसाठी योगदान दिलेल्या दानशूर लोकांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

आ.शिरीष चौधरी यांनी नागरिकांनी नियमांचे पालन करावे,सुरक्षित रहावे,लक्षणे असलेल्या रुग्णांना कोविंड सेंटरमध्ये नेऊन तपासणी करण्याचे आवाहन केले.प्रांतअधिकारी यांनी लॉकडाऊन व कोरोना संक्रमण काळात व्यवस्था निर्माण करण्यासाठी मदत केली त्यांचे आभार मानले.यावेळी प्रास्ताविक तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी केले.

यावेळी बाजार समितीचे सभापती श्रीकांत महाजन, काँग्रेस तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष नीलकंठ चौधरी, रावेर नगरपालिका गटनेते असिफ मोहम्मद, नगरसेवक सुरज चौधरी, सावदा येथील अख्तर हुसेन, पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, राज कंट्रकशनचे राजेंद्र चौधरी, डॉ.सुरेश पाटील, धनंजय चौधरी व मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचालन व आभार यासीन तडवी यांनी मानले.

दातुर्त्वाचा गौरव

रावेर बाजार समितीचे सभापती श्रीकांत महाजन, योगेश पाटील, अडत व्यापारी अतुल अग्रवाल, विलास चौधरी, केऱ्हाळे सरपंच राहुल पाटील, अटवाडा सरपंच गणेश महाजन, सिंगत सरपंच प्रमोद चौधरी, कोचुर सरपंच स्वाती परदेशी, राज कंट्रकशनचे राजेंद्र चौधरी, सावदा येथील अख्तर हुसेन, सुनील कोंडे, बी-बियाणे संघटना, सरपंच संघटना, रेशन दुकानदार संघटना, अंबिका व्यायाम शाळा, कापड व्यापारी युनियन, तांदलवाडी रुग्णवाहिका, स्वामी स्कूल, मक्रो-व्हिजन स्कूलचा या ठिकाणी गौरव करण्यात आला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com