जिल्ह्यात कोरोनाचे केवळ 5 नवे रुग्ण आढळले

13 तालुक्यांमध्ये एकही नवा रुग्ण नाही : सद्यस्थितीत 453 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण
जिल्ह्यात कोरोनाचे केवळ 5 नवे रुग्ण आढळले

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. आज जळगाव जिल्ह्यात नव्याने आढळून येणार्‍या कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी घट झाली आहे.

रविवारी जिल्ह्यात केवळ 5 कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दुसरीकडे 13 तालुक्यांमध्येही कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. ही जिल्हावासियांसाठी दिलासादायक बाब असून जिल्हयातून कोरोना हद्दपार होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे.

जळगाव शहरात केवळ 2 रुग्ण

जिल्ह्यात रविवारी जळगाव शहर 2 , जामनेर 3 याप्रमाणे 5 रुग्णांचा समावेश आहे. जळगाव ग्रामीण, भुसावळ, अमळनेर, चोपडा, भडगाव, धरणगाव, एरंडोल, यावल, रावेर, पारोळा, चाळीसगाव, मुक्ताईनगर, बोदवड या 13 तालुक्यांमध्ये आज एकही नवा रुग्ण आढळून आला नाही. जिल्ह्यात 60 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 1 लाख 39 हजार 335 एवढ्या रुग्णांनी आजपर्यंत कोरोनावर मात केली आहे.

जिल्ह्यात रविवारी चाळीसगाव तालुक्यातील एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 2 हजार 573 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाचे 453 अ‍ॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com