भरड धान्य खरेदीची प्रतीक्षा

जिल्ह्यातील 17 केंद्रांवर 17 हजार शेतकर्‍यांची ऑनलाइन नोंदणी
भरड धान्य खरेदीची प्रतीक्षा

लालचंद अहिरे । जळगाव :

रब्बी हंगाम 2020- 21 अंतर्गत जिल्हा मार्केट फेडरेशनकडून खरेदी होणार्‍या ज्वारी,मका, गहू या भरड धान्यांसाठी जिल्ह्याभरातून 17 हजार 329 शेतकर्‍यांनी ऑनलाइन नोंदणी करण्यात आली आहे.

ऑनलाइन नोंदणी करण्याचे सांगितले होते. जिल्ह्यातील 17 केंद्रांवर शेतकर्‍यांनी 30 एप्रिलपर्यंत ऑनलाइन नोंदणी केली असून आता शासनाच्या आदेशानंतर लवकरच भरड धान्य खरेदीला सुरुवात होईल.

गजानन मगरे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, जळगाव

जिल्ह्यातील 17 केंद्रांवर शेतकर्‍यांनी ऑनलाइन नोंदणी करण्याची मुदत दिलेली होती. आता 30 एप्रिलपर्यंत ऑनलाइन नोंदणीची मुदत संपली आहे.

मात्र, अजूनपर्यंत शासनाने भरड धान्य खरेदीसंदर्भात कोणतेही आदेश काढलेले नाही. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एक महिना उशिरा नोंदणी झाली असून आता शासनाकडून भरड धान्य खरेदीची प्रतीक्षा शेतकर्‍यांना लागून आहे.

रब्बी हंगाम 2020- 21 अंतर्गत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भरड धान्य विक्रीसाठी जळगाव जिल्ह्यात 17 केंद्रांवर शेतकर्‍यांनी ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील 17 हजार 329 शेतकर्‍यांनी भरड धान्य विक्रीसाठी नोंदणी केली आहे.

यात ज्वारी 10 हजार 679, मका 6 हजार 574, गहू 76 यांचा समावेश आहे. रब्बी हंगाम काढून दोन महिने उलटले आहेत.

अनेक शेतकर्‍यांच्या घरात धान्य पडून आहे. शासनाकडून अद्यापही भरड धान्य खरेदीबाबत शेतकर्‍यांना दिलासा मिळेल, असा कोणता निर्णय घेतला जात नसल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

फलकामुळे शेतकर्‍यांमध्ये संभ्रम

शेतकर्‍यांचा माल शासन खरेदी करेल, याबाबतचीही शाश्वती शासनाकडून देण्यात आलेली नाही. जिल्ह्यातील अनेक नोंदणी केंद्रांवर राज्य शासनाकडून फलक लावण्यात आले असून या फलकावर ज्या शेतकर्‍यांनी नोंदणी केलेली आहे. त्या शेतकर्‍यांचे धान्य खरेदी करणे हे शासनाला बंधनकारक नसल्याचे सांगितले आहे. यामुळे 17 हजार शेतकर्‍यांची ऑनलाइन नोंदणी झाली असली तरी शेतकर्‍यांच्या मालाची खरेदी होईलच याबाबत शासनाने स्पष्ट भूमिका घेतलेली नसल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी आहे.

शेतकरी आर्थिक संकटात

दरवर्षी मार्च महिन्यात भरड धान्याची विक्रीसाठी ऑफलाइन नोंदणी केली जाते. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 30 एप्रिलपर्यंत नोंदणी करण्यात आली. जिल्ह्यात एकूण 17 केंद्र मजूर असून भरड धान्य अंतर्गत ज्वारी,मका, गहू या धान्याची खरेदीसाठी शासनाकडून आदेश पारित न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कोरोनामुळे शेतकर्‍यांचा माल विक्री न झाल्यामुळे बी-बियाण्यांसाठी सावकाराचे उंबरठे झिजवावे लागणार आहे.

खरेदी केंद्र - ज्वारी - मका - गहू - एकूण

अमळनेर - 1181 - 537 - 00 - 1718

चोपडा - 545 - 415 - 14 - 974

पारोळा - 2170 - 854 - 07 - 3031

एरंडोल - 915 - 609 - 12 - 1536

धरणगाव - 876 - 757 - 18 - 1651

म्हसावद - 337 - 162 - 01 - 500

जळगाव - 476 - 152 - 05 - 633

भुसावळ - 25 -166 - 00 -191

यावल - 14 -154 - 00 - 168

रावेर - 05 - 301- 00 - 306

मुक्ताईनगर - 48 - 227 - 00 - 275

बोदवड - 34 - 16 - 00 - 50

जामनेर - 754 - 152 - 00 - 906

शेंदुर्णी - 436 - 242 - 00 - 678

पाचोरा - 870 - 650 - 06- 1526

भडगाव - 1062 - 560 - 12 - 1634

चाळीसगाव - 931 - 620 - 01 - 1552

एकूण - 10,679 - 6,574 - 76 - 17,329

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com