चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव नगरपरिषदेची सर्वसाधरण सभेचे आयोजन ऑनलाईन करण्यात आले होते. परंतू ऑनलाइन सभा नावालाच होती, प्रत्यक्षात न.पा.च्या सभागृहात १४ ते १५ सदस्यासह न.पा.चे आधिकारी व कर्मचारी उपस्थित होेते. सभागृहात जास्त संख्येने उपस्थित असलेल्या नगरसेवकांमुळे ऑनलाइन सभेचा पूर्णता; फज्जा उडाला, जे सदस्य घरी किवा बाहेरुन ऑनलाइन सभेत सहभागी झाले होते. त्यांना काहीच कळत नसल्याने सभागृहात मधून-मधून हॅलो-हॅलोचा गजर ऐकू येत होता. त्यामुळे न.पा.च्या ऑनलाइन सभेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत.

नगरपरिषदेच्या मुख्य सभागृहात सोमवारी नगराध्यक्षा आशालता विश्वास चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन सर्वसाधरण सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्षा आशाबाई रमेश चव्हाण, प्रभारी मुख्याधिकारी विकास नवाळे आदि उपस्थित होते. न.पा.च्या नावालच ऑनलाइन घेण्यात आलेल्या सर्वसाधरण सभेसाठी सभागृहात तब्बल १४ ते १५ नगरसेवक उपस्थित असल्याने ऑनलाईन सभा होती की? आफलाईन याबाबत प्रश्न चिन्हा निर्माण झाले.

सुरुवातीपासूनच ऑनलाईनच्या सिस्टीमध्ये दोष असल्याने, जे नगसेवक घरी किवा बाहेरुन सभेत सहभागी झाले होते, त्याना सभागृहात काय चालू आहे, हे व्यवस्थितरित्या समजत नव्हते. सभेत एकूण ४८ विषय अजेंठावर चर्चेसाठी ठेवण्यात आलेे होते. त्यातील पहिल्याच विषय मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, यावर नेहमीप्रमाणे शहवि आघाडीच्या नगरसेवकंानी हरकत घेत, मागील सभेत आम्ही सूचना केल्या होत्या, त्या दुरुस्त का केल्या नाही, असा मुद्द उपस्थित केला. यात शहरातील भुयारी गटारच्या मलनिस्सारण प्रकल्पाच्या जागेवर बांधकामाबाबत पुन्हा एकदा हरकत घेतली. यावेळी भाजपाचे गटनेते संजय पाटील यांनी तुम्ही पुन्हा-पुन्हा तोच मुद्दा उपस्थित करीत आहात, तुम्हाला हा प्रकल्प होऊ द्यायचा आहे का,नाही ? असा प्रश्न उपस्थित केले. तर नगरसेवक सुर्यकांत ठाकुर व रामचंद्र जाधव यांनी यावर आम्हाला मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी सविस्तर खुलासा द्यावा अशी मागणी केली.

मलनिस्सारण योजनेच्या तीन हरकती फेटाळ्या-

सभागृहात वाद निर्माण होत असल्याने प्रभारी मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी मलनिस्सारण योजनेबाबत सभागृहात स्पष्टीकरण देतांना सांगीतले की, शहरातील नागरिकांच्या मलनिस्सारण प्रकल्पसंदर्भात एकूण तीन हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्यावर दि,१८/१/२०२१ रोजी सुनावणी होवून त्या सर्व फेटाळ्यात आल्याचे सांगीतले. त्यानतंर नगरसेवक सुर्यकांत ठाकुर यांनी मलनिस्सारण योजनेच्या ठरावाबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित करुन, तुम्हाला हा प्रकल्प करण्याची इतकी घाई का झाली आहे असा मुद्दा उपस्थित केला. त्यावर नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी स्पष्टीकरण देत, त्याच-त्या मुद्दावर तुम्ही चर्चा करुन सभागृहाचा वेळ वाया घालत असल्याचे सांगत, पुढचा विषय घ्या, अशा सूचना कर्मचार्यांना दिल्यात. पुढे सभेपुढे ठेवण्यात आलेल्या ४८ विषयांपैकी विषय क्र.३५, ४६ ४७ या विषयासह व मलशुध्दीकरणाच्या मुद्दयावर पुन्हा सभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार चर्चा झाली, यात सेभत ऑनलाईन सहभागी झालेले, शहवि आघाडीचे गटनेते राजीव देशमुख यांनी देखील हरकत घेतली, तर भाजपाचेे नगरसेवक घृष्णेश्वर पाटील यांनी देखील चर्चेत सहभाग घेतला, यामुळे सभागृहात पुन्हा एकच गदारोळ निर्माण झाला होता, शेवटी सर्व विषयांना मजुरी देत सभा आटोपती घेण्यात आली.

याची होती सभागृहात उपस्थिती-

नावालचा ऑनलाइन घेण्यात आलेल्या न.पा.च्या सर्वसाधारण सभेसाठी सभगागृहात भाजपाचे गटनेेते संजय रतनसिंग पाटील, अरुण आहिरे, शेख चिरागुउद्दींन शेख, आनंद खरात, सुरेश स्वार, रामचंद्र जाधव, शेखर देशमुख,गिताबाई पाटील, योगिनी ब्राम्हणकार, सुर्यकांत ठाकुर, रविंद्र चौधरी, सायली जाधव, रंजना सोनवणे, मनिषा देशमुख आदि उपस्थित होती. तर ऑनलाईन राजीव देशमुख, घृष्णेश्वर पाटील, नाना कुमावत, सविता राजपूत, अण्णा कोळी, सविता पवार यांच्यासह इतर सदस्यांनी सहभाग नोंदवला.

सभेत हॅलो हॅलोचा गजर

नगरपरिषदेच्या ऑनलाइन सर्वसाधरण सभेवरच अनेक नगरसेवकांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले. अनेक सदस्यांना सभागृहात काय झालू होते, हे ऑनलाईनच्या सिस्टीममध्ये दोष असल्यामुळे समजत नव्हते, खुद्द शहवि आघाडीचे गटनेते राजीव देशमुख, शिवसेनेचे नाना कुमावत यांच्यासह अनेेकांनी याबाबत नाराजी व खंत व्यक्त केली. या सभेत कोणालाच कोणाचा आवाज व्यवस्थित ऐकू येत नसल्याने भर सभेत अनेकदा हॅलो-हॅलोच गजर ऐकू येत होतो. यावर मुख्याधिकार्यांनी स्पष्टीकरण देत सांगीतले की, आम्ही ऑनलाइन सभेसाठी वारंवार सूचना देवूनही सभागृहात नगरसेवक येत आहेत. त्यामुळे सर्वांना एकेमकांचा अवाज ऐकू येत नाही आहे. सर्वांना आपल्या मोबाईलमधूनच सहभाग घ्यावा अशी विनंती त्यांनी केली. परंतू अनेकांच्या मोबाईलमध्ये सिस्टींम ऍपडेट होत नसल्याने पूर्णता; गोंधळ निर्माण झाला होता.