निवृत्त प्राचार्यांसह तिघांची ऑनलाईन फसवणूक

निवृत्त प्राचार्यांसह तिघांची ऑनलाईन फसवणूक

जळगाव jalgaon।

सेवानिवृत्त प्राचार्य, कंपनीत काम करणार्‍या तरुणासह म्हसावद येथील शेतकर्‍याची Online fraud केल्याची घटना घडकीस आली आहे. या तिघ घटनांत 2 लाख 84 हजार 700 रुपयांत गंडविले असून या प्रकरणी एमआयडीसी MIDC व शहर पोलिसात city police गुन्हा crime दाखल करण्यात आला आहे.

म्हसावद येथील शेतकर्‍याला पावणेदोन लाखात गंडविले

किसान क्रेडीट कार्डची पेन्शन रक्कम भरण्याच्या नावाखाली म्हसावद येथील शेतकर्‍याची 1 लाख 68 हजारात ऑनलाईन फसवणुक केल्याची घटना 29 ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी गुरुवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील शेतकरी निंबा ठाकरे हे शेती करून ते आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात.

निंबा ठाकरे हे 29 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता त्यांना एका नंबरवरून फोन आला. आपण किसान क्रेडीट कार्ड मधून बोलत असल्याची बतावणी करून सांगितले की तुम्ही तु अजून पर्यंत किसान क्रेडीट कार्डची रक्कम भरलेली नाही. असे सांगितले. त्यावर ठाकरे यांनी सांगितले की आम्ही रक्कम भरलेली आहे. असे सांगितल्यानंतर अज्ञात व्यक्तीने त्यांच्याकडून कार्डचा नंबर मागितला आणि आलेला ओटीपीच्या मदतीने सुमारे 1 लाख 67 हजार 809 रूपये ऑनलाईन काढून घेतले. दोन दिवसानंतर त्यांनी खात्यातून रक्कम गेल्याचे समजले. निंबा ठाकरे यांनी एमआयडीसीत पोलिसात धाव घेत तक्रार दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि रविंद्र गिरासे करीत आहे.

कार्डचा क्रमांक सांगताच खात्यातून 80 हजार वर्ग

अ‍ॅक्सिस बँकेतून बोलत असल्याचे सांगत क्रेडीट कार्डचा क्रमांक विचारीत तरुणाला 80 हजारात ऑनलाईन गंडविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील मेहरुण परिसरातील आक्सानगरातील सैय्यद वसीम आबिद अली (वय-35) हा तरूण एमआयडीसीतील स्पेक्ट्रम कंपनीत कामाला आहे. एप्रिल 2021 मध्ये त्यांनी एका नंबरवरून अक्सीस बँकेतून बोलत असल्याचे सांगून त्यांनी 8 हजार रूपयांचे कूपन लागल्याचे सांगितले. यासाठी तुम्हाला आठ हजार आगोदर भरावे लागतील असे सांगितल्यावर सैय्यद वसीम यांनी त्यांच्या खात्यावर 8 हजार रूपये ऑनलाईन टाकेल.

काही दिवसानंतर सैय्यद वसीम यांनी एका पोस्टाद्वारे प्रत्येकी दोन हजार रूपयांचे दोन कूपन व एक घड्याळ आले. दरम्यान बुधवारी 1 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता पुन्हा एका नंबरवरून फोन आला की अक्सेस बँकेतून बोलत असल्याचे सांगून तुम्हा कुणीतरी कुपन पाठवून फसवणूक केल्याचे सांगून इतरांच्या तक्रारी आल्या आहे. फसवणूक झालेल्या लोकांना त्यांचे पैसे परत करत असून तुमचा क्रेडीट कार्डचा नंबर सांगा असे सांगितले. त्यावर सैय्यद वसीम यांनी 16 अंकी नंबर सांगितला असता त्यांच्या क्रेडीट कार्डच्या खात्यातून 50 हजार आणि 30 हजार रूपये वर्ग झाल्याचे दिसून आले.

फसवणूक झाल्याचे कळताच घेतली पोलिसात धाव

फसवणूक झाल्याचे समजताच सैय्यद वसीम यांनी गुरूवार 2 सप्टेंबर रोजी एमआयडीसी पोलीसात धाव घेतली व अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक फौजदार अतूल वंजारी करीत आहे.

व्हाट्सअ‍ॅपवर हाय पाठवित सेवानिवृत्त प्राचार्यांची फसवणूक

अनोळखी व्यक्तीने व्हाट्सअ‍ॅपवर हाय पाठवित एक फाईल पाठविली. फाईल ओपन करताच सेवानिवृत्त प्राचार्याची 36 हजारात फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोईटे नगरातील श्री रेसीडन्सी मधील रहिवासी अशोक फकिरराव साळुंखे (वय-74) हे धुळे जिल्ह्यातील कुसुंबा गावातील एम.के. शिंदे विद्यालयातून प्राचार्य पदावरून 2006 मध्ये सेवानिवृत्त झालेले आहे. त्यांची पेन्शनची रक्कम जळगाव शहरातील एसबीआयच्या मुख्य शाखेतील बँक खात्यात जमा होते. दरम्यान, गुरूवारी 1 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास त्यांनी व्हॉट्सप नंबर अज्ञात व्यक्तीने हाय करून पाठविला.

त्यानंतर एपीके नावाची फाईल पाठविले. साळुंखे त्यांनी ती फाईल ओपन केली असता फाईल ओपन होवून आपोआप बंद झाली. त्यानंतर त्यांच्या पेन्शन असलेल्या बँक खात्यातून अनुक्रमे 3 हजार 700, 20 हजार आणि 13 हजार असे एकुण 36 हजार 700 रूपये खात्यातून कमी झाल्याचे दिसून आले.

फसवणुक झाल्याचे कळताच साळुंखे यांनी तात्काळ बँकेत जावून चौकशी केली असता उत्तराखंड राज्यातील एका व्यक्तीच्या खात्यात वर्ग झाल्याचे सांगितले. त्यानुसार अशोक साळुंखे यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय कुमार ठाकूरवाड करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com