उ. म.वि.च्या पीएच.डी.च्या पेट परिक्षेसाठी
२१ पासून ऑनलाईन अर्ज

उ. म.वि.च्या पीएच.डी.च्या पेट परिक्षेसाठी २१ पासून ऑनलाईन अर्ज

जळगाव Jalgaon

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून (KBC North Maharashtra University) पीएच.डी. (Ph.d)प्रवेशासाठी प्रवेश पूर्व परीक्षेचे (PET Exam) आयोजन नोव्हेंबर महिन्यात करण्यात आले आहे. पीएच.डी. प्रवेश पूर्व परीक्षा २०२१ करीता २१ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर या कालावधीत विद्यापीठ संकेतस्थळ www.nmu.ac.in यावर ऑनलाईन अर्ज (Online application) उपलब्ध असतील

पीएच.डी. प्रवेश पूर्व परीक्षा २०२१ करीता २१ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर या कालावधीत विद्यापीठ संकेतस्थळ www.nmu.ac.in यावर ऑनलाईन अर्ज उपलब्ध असतील. संबंधित उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन भरुन सर्व संबंधित व आवश्यक कागदपत्रे जोडून या ऑनलाईन अर्जाची प्रत विद्यापीठ संशोधन विभागात दि.२३ ऑक्टोबर पर्यंत सादर करावयाची आहे.

परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांची तात्पुरती (Provisional) यादी ३० ऑक्टोबरला प्रसिध्द होईल. त्यावर आक्षेप १ नोव्हेंबर पर्यंत घेता येतील. त्यानंतर परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची अंतिम यादी ९ नोव्हेंबरला प्रसिध्द होईल.

परीक्षेची अंतिम तारीख २३ ते २६ नोव्हेंबर अशी राहिल. यासंदर्भातील सविस्तर वेळापत्रक व सूचना विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

पीएच.डी. प्रवेशासाठी इच्छुकांनी आपले अर्ज ऑनलाईन सादर करावेत असे आवाहन संशोधन विभागाचे सहायक कुलसचिव (Assistant Registrar of Research Department) व्ही.व्ही.तळेले (V.V. Talele) यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com