जळगाव : चित्रपटगृह कामगारांवर उपासमारीची कुर्‍हाड

एक पडदा चित्रपटगृहे चार महिन्यापासून बंद
जळगाव : चित्रपटगृह कामगारांवर उपासमारीची कुर्‍हाड

जळगाव - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यांपासून एक पडदा चित्रपटगृह बंद आहे. त्याचसोबत व्यापारी प्रतिष्ठाने सुद्धा बंद आहेत. त्यामुळे अनेक कामगारांवर उपासमारीची कुर्‍हाड कोसळली आहे. तसेच चित्रपटगृहाचे मालकही आर्थिक संकटात सापडले आहे. परिणामी सर्व एक पडदा सिनेमागृह प्रेक्षकांच्या सुरक्षेसाठी सर्व काही उपाय योजना करण्यास तयार आहेत. शासनाने एक पडदा चित्रपटगृहांना सुरू करण्याची परवानगी दयावी, अशी मागणी जळगाव चित्रपट प्रदर्शित संघाचे अध्यक्ष महेंद्र लुंकड यांनी शासनाकडे निवेदनाव्दारे केली आहे.

महाराष्ट्रात 21 मार्चपासून सर्व ठिकाणी लॉकडाऊन आहे. परंतु सर्व चित्रपट गृृह दि. 16 मार्चपासून सक्तीने बंद पाडले, हा मेदभाव का? आजपर्यंत शासनाने व प्रशासनाने अब्जो रुपये कोरोना घालवण्यासाठी खर्च केले व करत आहेत. परंतु त्यात फारसे यश मिळत नाही. शासनाने व स्थानिक प्रशासनाने सर्व व्यापारी प्रतिष्ठाने सक्तीने बंद करीत केले आहेत. काहींवर जप्ती बजावली आहे तर काहींवर गुन्हा दाखले केले आहेत.

कोरोना कोणत्याही परिस्थितीत आटोक्यात येणार नाही, जोपर्ंत त्यावर 100टक्के औषध किंवा व्हॅक्सीन निघत नाही. तोपर्यंत व्यापारी प्रतिष्ठाने सक्तीने बंद करण्याचा काय फायदा आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

व्यापारी प्रतिष्ठाने व एक पडदा चित्रपटगृह चार महिन्यापासून बंद आहेत. या बंद काळात प्रत्येक एक पडदा चित्रपटगृहांचे 25 लाखांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. प्रत्येक नागरिक नियमाचे कोटेकोर पालन करीत आहे. तरी शासनाने एक पडदा चित्रपटगृहांना सुरू करण्याची परवानगी द्यावी,असेही महेंद्र लुंकड यांनी निवेदनात म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com