खरजई येथे गावठी कट्यासह एकजण ताब्यात

खरजई येथे गावठी कट्यासह एकजण ताब्यात
हाच गावठी कट्टा पोलिसांनी जप्त केला आहे

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

तालुक्यातील खरजई(Kharjai) येथे एकास गावठी कट्टा (Gawthi Katya)व जिवंत काडतुससह चाळीसगाव पोलिसांनी (chalisgaon police) ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

.

खजरई गावातील मोरया कृषी केंद्राजवळ एक जण गावठी कट्टा घेवून फिरत असल्याची गुप्त माहिती चाळीसगाव पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी खरजई गावात धडक देवून, दिपक गणेश एरंडे(२३) यास ताब्यात घेतले, त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याजवळ एक गावठी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुस असा एकूण २० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल मिळुन आला. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला दिपक एरंडे यांच्या विरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. हि कारवाई पो.नि.के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिपक बिरारी, पोना. दिपक पाटील, तुकाराम चव्हाण, पोकॉ.अशोक मोरे, गणेश कुंवर, शरद पाटील आदिच्या पथकाने केली आहे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com