धरणात बुडून मृत्यू नव्हे तो तर खूनच

न्यायालयाच्या आदेशान्वेय पाच जणांविरोधात गुन्हा
धरणात बुडून मृत्यू नव्हे तो तर खूनच

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

तालुक्यातील हातले येथील २० वर्षीय तरुणाचा धरणाच्या (Dam)पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. परंतू आता याप्रकरणाने नवीन माहिती सामोर येत आहे. मागील वादाचा बदला घेण्याच्या कारणावरून आपल्या मुलाला पोहायला जाण्याचे निमित्त करून धरणावर नेले आणि त्याचा गळा दाबून पाण्यात बुडवून निर्दयीपणे खून केला, असा आरोप मृताच्या वडिलांनी केला. (Court) न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशान्वये पाच जणांविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत (Chalisgaon Rural Police) खुनाचा गुन्हा (murder) दाखल करण्यात आला आहे.

धरणात बुडून मृत्यू नव्हे तो तर खूनच
किराणा दुकानातून काजू, बदामासह ४३ हजारांचा मुद्देमाल लपास

मयत सुधाकर राजधर झाल्टे (वय ५०) रा. हातले यांचे संशयित आरोपींशी पूर्ववैमनस्यातून वाद सुरू होते. या वादाचा बदला घेण्याच्या कारणावरून आरोपींनी संगनमताने त्यांचा मुलगा सागर झाल्टे याला ३ मे रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान गोड बोलून हातले वाघले गावाजवळील धरणावर पोहायला नेले. तेथे सागर याचा गळा दाबून त्यास पाण्यात बुडवून त्याचा निर्दयपणे खून केला.

तसेच त्याचे वडील सुधाकर झाल्टे यांना शिवीगाळ करून दम दिला. या प्रकरणी पूर्वी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. गुन्हा दाखल न झाल्याने सुधाकर झाल्टे यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशाने १५ महिन्यानंतर २० रोजी सुधाकर झाल्टे यांच्या तक्रारीवरून सागर याच्या मृत्यू प्रकरणी संशयित चेतन साहेबराव झाल्टे, सागर तात्या झाल्टे, दादा शिवराम बाविस्कर, मुकेश सीताराम झाल्टे, भूषण लक्ष्मण झाल्टे सर्व रा. हातले यांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com