बैल धुवायला धरणात गेलेला १५ वर्षांचा मुलगा बुडाला

बैल धुवायला धरणात गेलेला १५ वर्षांचा मुलगा बुडाला

एरंडोल तालुक्यातील खर्ची येथील घटना

जळगाव :- पोळा सणानिमित्ताने बैल धुवायला धरणात गेलेल्या सागर ज्ञानेश्वर माळी वय १५ रा. खर्ची ता. एरंडोल या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडेआठ वाजता घडली.

पोळा असल्याने सागर ग्रामस्थांसमवेत घरचे बैल घेऊन धरणावर धुवायला गेला होता. यादरम्यान तो पोहत असताना त्याचे पाय चिखलात अडकले व तो बुडाला. हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्याला तातडीने पाण्याबाहेर काढून जिल्हा रुग्णालयाकडे हलविले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच जळगावातील खोटेनगरजवळ त्याचा मृत्यु झाला. सागर आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होता त्याच्या पश्चात आई वडील बहीण भाऊ असा परिवार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com