नदीत बुडून एकाचा मृत्यू
जळगाव

नदीत बुडून एकाचा मृत्यू

दसनूर येथील घटना

Ramsing Pardeshi

दसनूर ता. रावेर (वार्ताहर) - Raver

येथील ५२ वर्षीय इसमाचा सुकी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

येथील बेघर वस्तीतील जगन नातू तायडे (वय ५२) हे सोमवारपासून बेपत्ता होते. त्यांचा मृतदेह मंगळवारी सकाळी सुकी नदी पात्रात मिळून आल्याची माहिती पोलीस पाटील दीपक चौधरी यांनी निंभोर पोलीस स्टेशनला कळविली असून, घटनास्थळी गावातील लोकांची खूप गर्दी झाली आहे.

मयताच्या पश्चात वयोवृद्ध आई आहे. दरम्यान नदी पात्रात अवैध वाळू उत्खननाने खूप मोठे खड्डे पडल्यामूळे अशा घटना घडत आहे. याबाबत महसूल विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com