चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

चाळीसगाव औरंगाबाद महामार्गावर कन्नड घाटात दर्ग्या जवळ दोन दुचाकींची समोरा-समोर धडक झाली, यात उपचारा दरम्यान एकाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मयत कैलास कारभारी गायवाड(२९) रा.अंधानेर, ता.कन्नड, जि. जळगाव हे दि, १९/११/२०२० रोजी त्यांच्या दुचाकीने(क्र.एमएच २०,ए.झेड ३१२१) ने चाळीसगाकडून कन्नडकडे जात असताना, कन्नड घाटातील दर्गा जवळ समोरुन कन्नडकडुन चाळीसगावकडे येणार्या एका दुचाकावरील (क्र.डीबी,६९०६०) चालकाने त्यांना समोरा-समोर धडक दिली.

यात कैलास कारभारी हे गंभीररित्या जखमी झाले होत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असातानाच, आज उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला नितीन कारभारी गायकवाड रा.अंधानेर, ता.कन्नड,जि.जळगाव यांच्या फिर्यादीवर दुचाकी (क्र.डीबी,६९०६०) वरील अज्ञात चालकविरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.संपत आहिर करीत आहेत.