दागिण्यांवर ह्युड सक्तीविरोधात जिल्ह्यातील दोन हजार सुवर्णपेढ्या बंद

जळगाव जिल्ह्यात 25 कोटींची उलाढाल ठप्प
दागिण्यांवर ह्युड सक्तीविरोधात जिल्ह्यातील दोन हजार सुवर्णपेढ्या बंद

जळगाव Jalgaon

सोन्याच्या Gold दागिण्यांवर सद्यास्थितीला चार प्रकारचे मार्कींग आहे. मात्र यात बदल करुन, ह्युड Hallmark (हॉलमार्क युनिक आयडीफिकेशन) ची सक्ती करण्याबाबत केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. ह्युड जाचक असल्यामुळे त्याविरोधात जळगाव जिल्ह्यासह देशभरातील सुवर्ण व्यावसायिकांनी एक दिवसीय व्यवसाय बंद ठेवून केंद्र शासनाचे लक्ष वेधले आहे. दरम्यान, जिल्हयात एकदिवसीय सुवर्णव्यवसाय बंद ठेवल्यामुळे २५ कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे.

केंद्र शासनाने सोन्याच्या दागिण्यांवर भारतीय मानक ब्युरोने दागिण्यांच्या शुध्दतेच्या चार प्रमाणित शिक्क्यांमध्ये अचानक बदल केले. या चार प्रकारच्या शिक्क्यांमध्ये कारागिर, दुकानदार, बीआयएस आणि दर्जा या प्रकारचे सद्यास्थितीला मार्किंग आहे. मात्र केंद्र शासनाने ह्युडची अंमलबजावणी केली आहे. प्रत्येक दागिण्यांवर सहा अंकी मार्किंग कोड असणार आहे. ही प्रक्रिया व्यापार्‍यांसाठी अत्यंत त्रासदायक आहे, जाचक आहे. त्या निर्णयाविरोधात जळगाव शहर, जळगाव जिल्हा सराफ असोसिएशनतर्फे एक दिवसीय बंद पुकारण्यात आला आहे. या बंदला जिल्ह्यात उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.


बंदमध्ये दोन हजार सुवर्ण पेढ्यांचा समावेश


सुवर्ण व्यवसायामध्ये जळगाव शहरासह जिल्ह्याचे नाव देश-विदेशात लौकिक आहे. शहरात दिडशे तर जिल्हाभरात दोन हजार सुवर्णपेढ्या आहेत. या सुवर्ण पेढ्यांमध्ये जवळपास १५ हजार कारागिर आहेत. ह्युड सक्तीच्या विरोधात एकदिवसीय बंद आंदोलनात जिल्ह्यातील दोन हजार सुवर्ण पेढ्या बंद होत्या.

"दागिण्यांवरील हॉलमार्कचे आम्ही स्वागत केले आहे. मात्र, हॉलमार्क युनिक आयडिफिकेशन (ह्युड) ला विरोध आहे. ह्युड जाचक असून, व्यापार्‍यांसाठी त्रासदायक आहे. त्यामुळे ह्युडला देशभरातील सुवर्ण व्यावसायिकांचा विरोध आहे. "

-स्वरुपकुमार लुंकड, सचिव, जिल्हा सराफ असोसिएशन, जळगाव

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com