पाटणा येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या
जळगाव

पाटणा येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या

Manohar Kandekar

चाळीसगाव - Chalisgaon - प्रतिनिधी :

तालुक्यातील पाटणा येथे एक ५५ वर्षीय इसमाने स्वता;च्या राहत्या घरातच छताला गळफास घेवून आत्महत्या केली आहे. हि घटना दि,२५ रोजी संकाळी उघडकीस आली.

याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राजेंद्र तोताराम वाघ(५५) असे मयताचे नाव आहे.

दरम्यान त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पोलीस पाटील अमोल चौधरी यांच्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ.महेंद्र साळुंखे करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com