लालपरितून फक्त १४८ प्रवाशांचा प्रवास
जळगाव

लालपरितून फक्त १४८ प्रवाशांचा प्रवास

चाळीसगाव बसस्थान पुन्हा प्रवशांनी गजबले, परजिल्ह्यासाठी १४ फेर्‍यातून सहा हजारांचे उत्पन्न

Manohar Kandekar

चाळीसगाव | प्रतिनिधी Chalisgaon

लॉकडाऊन नतंर पहिल्यादाच एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात जाण्यासाठी बस सेवा सुरू करण्यात आल्याने आज (गुरुवारी) पुन्हा चाळीसगाव बस स्थानक प्रवशांनी गजबले होते. परजिल्ह्यात जाण्यासाठी बसची सोय झाली मात्र...

पहिल्या दिवशी फक्त १४८ प्रवाशांनी बसने प्रवास केला. पहिल्या दिवशी प्रवशांची गर्दी कमी असली, तरी सोमवारपासून बससेवा सुरळीत होण्याचा अंदाज वर्तवल जात आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीमुळे गेली ५ महिने एसटीची आंतरराज्य व राज्यांतर्गत सेवा बंद करण्यात होती. परंतू गुरुवार पासून ती सुरु करण्यात आली. पहिल्या दिवशी येथील आगारातून १४ बसेस परजिल्ह्यात जाण्यासाठी सोडण्यात आल्या होत्या.

यात धुळे, मालेगांव, जळगाव, पारोळा आदि ठिकाणांचा समावेश आहे. त्यातून १४८ प्रवशांनी प्रवास केला असून आगाराला ६ हजार १९७ रुपयांचे आर्थिक उत्पन्न झाले. गुरुवारी पहिल्यादाच एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात जाण्यासाठी एसटीची बस सेवा सुरू करण्यात आल्याने, प्रवाशांची गर्दी कमी होती. तसेच पुढे दोन दिवस सुट्टी व गणपती उत्सव आल्यामुळे फारशी प्रवाशीची गर्दी होणार नाही. परंतू सोमवार पासून चाळीसगाव आगारात परजिल्ह्यात जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यत आहे. कारण चाळीसगाव तालुका हा चार जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असून ऐरवी येथून दररोज सात ते आठ हजार प्रवासी बसने प्रवास करतात. त्यात चाकरमान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आले. त्यामुळे पुन्हा एकदा नव्याने येथील आगाराच्या आर्थिक उत्पन्नात भर पडणार आहे.

एसटीच्या प्रवासासाठी ई पासची आवश्यकता नाही. प्रवासात प्रवाशांनी मास्क घालण्यासह शासनाने घालून दिलेल्या कोविड - १९ च्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे बंधणकारक आहे. तसेच राज्य शासनाच्या धोरणानुसार बसमध्ये केवळ २२ प्रवाशांना परवानगी आहे.

प्रवाशांच्या प्रतिसादानूसार परजिल्ह्यात जाण्यासाठी जादा बसेस चाळीसगागव आगारातून सोडण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे, पहिल्या दिवशी प्रवशांचा अल्प प्रतिसाद मिळाला, तरी देखील सोमवारपासून बसेसची पूर्वी प्रमाणे वाहतुक होण्याची शक्यता आहे. पहिल्या दिवशी सर्व बसेस ह्या निर्जंतुकीकरण करुनच सोडण्यात आल्या होत्या. तसेच प्रवशांना देखील मास्क लावून शासनाच्या नियमावलीप्रमाणेच बसमध्ये प्रवेश देण्यात आला. यापुढे देखील सर्व बसेस निर्जंतुकीकरण करुनच प्रवासाची रवाना करण्यात आली येईल.

संदिप निकम, आगार व्यवस्थापक

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com