रक्षा बंधनाच्या पुर्वसंध्येला बाजारपेठ गजबजली

रक्षा बंधनाच्या पुर्वसंध्येला बाजारपेठ गजबजली

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

श्रावण महिन्यात पहिला सण म्हणजेच Raksha Bandhan या सणाची प्रत्येक भाऊ बहिण Brother sister आतुरतेने वाट पाहत असतात. रक्षा बंधन उद्यावर येवून ठेपली असल्याने प्रत्येकाची रक्षाबंधनाची तयारी केली जात आहे. रक्षा बंधनासाठी बाजारात विविध प्रकाराच्या रंगेबीरंगी राख्या विक्रीस आल्या असून राख्यांची खरेदी Rākhyān̄cī kharēdī करण्यासाठी सकाळपासून बाजारपेठेत प्रचंड गर्दी Huge crowd in the market उसळली होती.

श्रावण महिन्यापासून सर्व सणांना सुरुवात होत असते. या महिन्यातील पहिला सण म्हणजेच रक्षा बंधन असल्याने तो संपुर्ण देशात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जात असतो. बहिण भावाच्या प्रेमाचे नाते दृढ करणारा सण म्हणजेच रक्षा बंधन प्रत्येक तरुणी आपल्या लाडक्या भावाला राखी बांधण्यासाठी या सणाची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात.

तर भाऊराया देखील बांधलेल्या राखीच्या मोबदल्यात आयुष्यभर आपल्या बहीणीच्या संरक्षणाची जबाबदारी घेत असतो. रक्षा बंधनाला बहीण आपल्या लाडक्या भावाचे औक्षण करुन त्याला राखी बांधत असते हा राखीचा छागा आयुष्यभर आपला लाडका भाऊ आपल्या बहिणीचे संरक्षण करीत असल्याने तो संपूर्ण देशभरात विविध प्रकारे साजरा केला जात असतो.

दरात 20 टक्क्याने वाढ

सुरत, गुजरातसह मुंबई येथून राख्यांचा मालाची आयात केली जात असते. राखीसाठी लागणारा धाग्यासह कच्च्या मालाच्या भावात वाढ झाली. त्यामुळे राखीच्या भावात गेल्या वर्षीच्या तुलनेत 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली असून राख्यांच्या भावात वाढ झाली आहे. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांनाच सहन करावा लागणार आहे.

जळगावात सजली बाजारपेठ

जळगाव शहरातील बाजारपेठेत पारंपारीक राख्यांसह लहानमोठे डायमंड, रुद्राक्ष यासह छोटाभीम, डोरेमॉन यासह चिमुकल्यांसाठी लाईट लागणार्‍या व म्युझिकची विविध प्रकारच्या राख्या विक्रीसाठी आल्या असल्याने बाजारपेठ सजली होती.

रक्षाबंधन उद्यावर येवून ठेपल्याने महिलांनी राखी खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली होती. बर्‍याच दिवसांपासून ओस असलेली बाजारपेठे राखी सणाच्या निमित्ताने पुन्हा बहरली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com